शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन आवश्यक, परिवहन मंत्री दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:04 IST

देशभरातील अपघाती राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेल्या महाराष्ट्रात अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन सजग आणि संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली. रस्ता सुरक्षा पंधरवडा सांगता सोहळयात मंत्री रावते मुंबईत बोलत होते.

मुंबई : देशभरातील अपघाती राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेल्या महाराष्ट्रात अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन सजग आणि संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली. रस्ता सुरक्षा पंधरवडा सांगता सोहळयात मंत्री रावते मुंबईत बोलत होते.परिवहन विभागामार्फत रस्ते सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. मंगळवारी या पंधरवड्याचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार हे उपस्थित होते.यावेळी मंत्री रावते म्हणाले की, ग्रामीण भागात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबरोबर दुचाकींच्या अपघातांची आणि त्यात मृत्यूमुखी पडणाºयांची संख्याही वाढली आहे. हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनांमध्ये आसन सुरक्षा पट्टाचा (सीटबेल्ट) वापर यासारख्या छोट्या उपाययोजनांचा अवलंब केला तरी अपघातातील जिवीतहानी टाळता येईल. यासाठी जनतेने संवेदनशीलतेने आणि सजगपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.देशभरात रस्ते अपघातात दरवर्षी सव्वा ते दिड लाख लोकांचा मृत्यू होतो. देशाच्या मनुष्यबळाची ही फार मोठी हानी आहे. आपल्या देशात जगातील फक्त ०२ टक्के वाहने आहेत. पण जगातील १० टक्के रस्ते अपघात आपल्या देशात होतात.हे कोणत्याही परिस्थितीत रोखणे आवश्यक असून यासाठी वाहनचालकांनी रस्ते नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे मत परिवहव विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी मांडले.वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी कार्य केल्याबद्दल या सांगता कार्यक्रमात पश्चिम रेल्वेचे सहाय्यक व्यवस्थापक विद्याधर मालेगावकर यांनाही मंत्री रावते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.‘समृद्धी’ महामार्गावर रस्ते सुरक्षेची अंमलबजावणीमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची बांधणी करताना रस्ते सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले.विनाअपघात वाहन चालविणाºया वाहनचालकांचा सत्काररस्ता सुरक्षेसाठी कार्य करणाºया विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा मंत्री रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेस्टर्न इंडीया आॅटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा, आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली, सीएएसआयचे परेश सेठ आणि मितेश सेठ, वी कॅनच्या इंद्राणी मलकानी, राधी फाउंडेशनचे आसीफ रेशमवाला यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.सार्वजनिक वाहतुकीतील अधिकाºयांचा गौरवसार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत विना अपघात वाहन चालविणाºया वाहनचालकांचाही सांगता कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यात बेस्टचे सखाराम मेतकरी (मागाठाणे आगार), संजय जाधव (मागाठाणे आगार), रामशिष यादव (विक्रोळी आगार), एसटी महामंडळाचे उमर खान रहिम खान (बीड आगार), सदाशिव खवरे (आजरा आगार, जि. कोल्हापूर), मोहम्मद हुसेन लाल मोहम्मद (चिखली आगार, जि. बुलढाणा) यांना गौरविण्यात आले. 

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेroad safetyरस्ते सुरक्षाMaharashtraमहाराष्ट्र