शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: July 20, 2016 02:03 IST

येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

कामशेत : येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यांवरील व्यावसायिकांची अतिक्रमणे, बेशिस्तपणे रस्त्यातच उभी केलेली वाहने, व्यापाऱ्यांच्या वेळी-अवेळी येणाऱ्या मालाच्या गाड्या यामुळे वाहतूककोंडीत भर पडत असल्याने शहरवासीयांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. कामशेत ही मावळ तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असून, नाणे, पवन व आजूबाजूच्या सुमारे सत्तर गावांचे हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक खासगी दवाखाने, मध्यवर्ती रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आदी महत्त्वाची ठिकाणेही येथे आहेत. यामुळे विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शेतकरी व व्यावसायिकांची शहरात मोठी वर्दळ असते. महामार्ग व लोहमार्ग शहरात असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना पुणे-मुंबईला जाण्यासाठी कामशेतमध्ये यावे लागते. रोज लाखोंची उलाढाल असणाऱ्या कामशेतमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक लोक रस्त्याच्या कडेलाच वाहने लावतात. मुख्य रस्त्यावर दुकानदारांची अतिक्रमणे असून, यामुळे रस्त्याच्या साइडपट्ट्याच गायब झाल्या आहेत. दुकानदारांचा माल रस्त्यावर येत आहे. त्यात हातगाडीवाले, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते हेदेखील वाहतूककोंडीत भर घालत असल्याने शहरात वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. सकाळी, दुपारी व सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीची छत्रपती शिवाजी चौक, पवनानगर रोड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, साईबाबा चौक, बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रोड आदी ठिकाणे आहेत. (वार्ताहर)कामशेत शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर पार्किंगला शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. पण, सम-विषम तारखेचे बोर्ड फक्त नावापुरतेच उरले आहेत. अनेक नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे दहा मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. या वाहतूककोंडीतून पायी जात असताना नागरिक, विद्यार्थी व महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातूनच अनेक वेळा वाहनांचे धक्के लागून किरकोळ अपघातही होतात. बाचाबाचीचे प्रकार घडत असतात. शहरातील व्यापाऱ्यांच्या मालांच्या गाड्या माल उतरविण्यासाठी आणण्याबाबत पोलिसांनी ठरावीक वेळ दिली असताना ती वेळ पाळली जात नाही. भर रस्त्यात तासन्तास मालवाहतूक ट्रक थांबवून माल खाली केला जातो. या सर्वांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून पोलिसांची कारवाई ठरावीक दिवस सोडले, तर होत नाही. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, व्यापाऱ्यांची उदासीनता व पोलिसांची कारवाईबाबत ठोस भूमिका नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.