शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सोपान महाराजांनी व्यवसाय सांभाळत जपली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:27 IST

वारकरी संप्रदाय हळहळला

पंढरपूर (जि़सोलापूर) : संत नामदेव महाराज म्हणाले होते, आमुचा जन्म हा शिंप्याच्या कुळातला. हीच परंपरा त्यांचे सतरावे वंशज ह.भ.प. सोपान महाराज यांनीही जपली. त्यांच्या अपघाती निधनाने पंढरीतील शिंपी समाज आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली होती. अनेकांनी आपली दुकाने मंगळवारी बंद ठेवली आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आळंदी गाठली. नामदेव महाराज मंदिराच्या ठिकाणी मंगळवारी शोकमय वातावरण होते.संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे सर्व नियोजन सोपान महाराज पाहत असत. पंढरपूर येथे नामदेव मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांची नियमित उपस्थिती असायची. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत असताना आपला शिंपी व्यवसायही त्यांनी सुरु ठेवला होता. बाहेरून आलेल्या आॅर्डरप्रमाणे घरांमध्ये ते कपडे शिवून देत असत. अपघातापूर्वी त्यांचे घरातील मंडळींचे बोलणे झालेहोते. सुरुवातीच्या काळात ते नामदेव मंदिराच्या ठिकाणी वास्तव्यास होते नंतर त्यांनी, श्री विठ्ठल मंदिराजवळील उत्तर द्वाराजवळ घर घेतले. सध्या त्याठिकाणी त्यांचे वास्तव्य होतं.आळंदीत अंत्यसंस्कारह़भ़प़ सोपान महाराज हे पालखी सोहळ्यासह आळंदीकडे जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे आळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांची समाधी होणार आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन अपघातातील जखमींची विचारपूस केली. सर्व १९ जखमी वारकऱ्यांच्या औषधोपचाराचा खर्च भाजप करणार असून मृतांच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही जखमी वारकºयांची भेट घेतली.नामदेव महाराजांच्या पायरीचे नित्य दर्शननामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे देती पाय! विठ्ठलाच्या प्रवेशद्वाराला नामदेव महाराजांची समाधी आहे. त्यास नामदेव पायरी असे संबोधले जाते.त्या नामदेव पायरीचे सोपान महाराज नामदास हे रोज दर्शन घेत असत. त्यांचा हा नित्यनेम कधी चुकला नाही, असे वारकरी सांगतात.