शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पर्यटकांची सुरक्षा धोक्यात !

By admin | Updated: June 28, 2016 02:35 IST

शनिवारी रात्री बळी घेतल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाड : रायगड किल्ल्यावर आलेल्या पुण्याच्या २८ वर्षीय आयटी इंजिनीअर असलेल्या पर्यटकाचा गडाच्या कड्यावरून कोसळलेल्या दगडाने शनिवारी रात्री बळी घेतल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे रायगड किल्ल्याच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यानेच गडदर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्त पर्यटकांचे बळी जाण्याच्या दुर्घटना घडत असल्याचा आरोप पर्यटकांकडून केला जात आहे. आणखी किती बळी गेल्यावर निद्रिस्त असलेल्या पुरातत्त्व विभागाला जाग येणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.शनिवारी रात्री पथमार्गाने पायऱ्या उतरणाऱ्या अजयप्रतापसिंह प्रदीपसिंह सिकरवार या ट्रेकरच्या अंगावर पथमार्गाच्या कडेलाच असलेल्या कड्यावरून दगड कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी देखील गड उतरणाऱ्या एका पर्यटकाच्या अंगावर दगड कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी या दगडी कोसळणाऱ्या कड्याला संरक्षण जाळ्या बसवण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली होती. मात्र पुरातत्त्व विभागाने पर्यटकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली नाही. गड दर्शनासाठी येणारे हौशी पर्यटक रोप-वेऐवजी पायऱ्यांनी चढून गडावर जातात. मात्र या पायऱ्यांच्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली असून बाजूूंचे कठडे देखील अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत आहेत. कोसळलेल्या पायऱ्यांवरून तोल जावून पर्यटक पडून गंभीर जखमी होण्याच्या घटना नियमितपणे घडतात, तर दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या पायऱ्यांवर घसरून पडलेल्या एका सहलीबरोबर आलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पायऱ्यांच्या मार्गाने गडावर जाणाऱ्या शैक्षणिक सहलीतील विद्यार्थी पडून गंभीर जखमी होण्याच्या घटना नियमित घडतात. मात्र कोसळलेले कठडे व पायऱ्यांची दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे येथील दुरवस्थेवरून लक्षात येते.रायगड महोत्सवाचा निधी गड संवर्धनासाठी उपयोगी आणावयास हवा होता, अशी अपेक्षा शिवभक्तांनी या घटनेनंतर व्यक्त केली. (वार्ताहर)>सुरक्षेची काळजी घ्यावीया दुर्घटनेत मरण पावलेल्या अजयप्रतापसिंह यांची बहीण मनीषा सिंह यांनी आपल्या भावाच्या मृत्यूच्या दु:खातून स्वत:ला सावरत किमान यापुढे तरी गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी पुरातत्त्व विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझा भाऊ गमावला आहे. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनेत कुणाला जीव गमावण्याची वेळ पुरातत्त्व विभागाने आणू नये, असे मनीषा सिंह यांनी भावुकपणे सांगितले.