शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 200 ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी निवासी व्यवस्था उभी करणार- पर्यटन मंत्री जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:19 IST

पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे.

मुंबई : पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करेल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात पर्यटन पर्व साजरे करण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, कंपन्या यांच्या उपस्थितीत काल हॉटेल ट्रायडंट येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.एमटीडीसी रिसॉर्टस्‌मध्ये पर्यटकांना सवलतपर्यटन पर्वाच्या काळात एमटीडीसीच्या रिसॉर्टस्‌मध्ये राहणाऱ्या पर्यटकांना प्रोत्साहन सवलत देण्यात यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना केली. ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने पारंपरिक पर्यटनाबरोबरच हेरिटेज टुरिजम, ॲग्री टुरिजम, क्रुझ टुरिजम, माईन टुरिजम, कॅराव्हान टुरिजम, वेलनेस टुरिजम, बॉलिवूड टुरिजम, वाईल्डलाईफ टुरिजम अशा विविध नवनवीन पर्यटन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात या सर्वच पर्यटन क्षेत्रात मोठा वाव आहे. पर्यटन पर्व काळात पर्यटनाच्या या नवीन क्षेत्रांना उजाळा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.हेरीटेज टुरिजमला महाराष्ट्रात मोठा वावमुंबईत नुकतेच हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील ऐतिहासिक इमारती, किल्ले, राजवाडे यांची माहिती जाणून घेण्यात देश-विदेशातील पर्यटकांना मोठा रस आहे. त्यासाठी हेरीटेज टुरिजमला चालना देण्याच्या दृष्टीने एमटीडीसीमार्फत यापुढील काळात व्यापक प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील महत्वाच्या २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष तिथे राहून माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने या किल्ल्यांमध्ये निवास व्यवस्था उभी करण्याबाबत केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून नियोजन करण्यात येईल, असे ते म्हणाले.     एमटीडीसीमार्फत पर्यटन पर्वाच्या काळात राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा, ह्यमाय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरीह्ण ही चित्रपट स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, प्रवासातील अनुभव शेअर करण्याबाबतची कार्यशाळा, चित्रकला-हस्तकला प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे.पर्यटन पर्व शुभारंभप्रसंगी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांच्यासह जीव्हीके, जेट एअरवेज, एतिहाद, ओला, कॉक्स अँड किंग्ज, कोस्टा क्रुजेस, एअर बी अँड बी आदी विविध प्रवासी तथा पर्यटन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.