शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघातील चुरशीची; निवडणूक पडली पार 

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 26, 2024 20:10 IST

मुंबई शिक्षक मतदारसंघांमध्ये एकूण पाच उमेदवारांची कसोटी लागणार आहे. १३३१४  मतदार असलेल्या या  मतदार संघात तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

मुंबई -मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले.सकाळी सात पासूनच मतदार केंद्रावर मतदारांनी मतदानास सुरवात केली.सकाळ पासूनच मतदान केंद्रावर नेहमीपेक्षा गर्दी दिसत होती.

मुंबई शिक्षक मतदारसंघांमध्ये एकूण पाच उमेदवारांची कसोटी लागणार आहे. १३३१४  मतदार असलेल्या या  मतदार संघात तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे हे रिंगणात आहेत. तर उद्धव सेनेचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे सेनेचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक ही चुरशीची होणार आहे.

पदवीधर मतदार संघामध्ये उद्धव सेनेचे अँड. अनिल परब आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण शेलार यांच्या मध्ये सरळ सामना होणार आहे. या मतदार संघात ८९९२८ पदवीधर मतदार आहेत.गेली अनेक वर्ष पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आणि यावर्षी तो आपल्याकडे खेचण्याचा चंग बांधला आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांनी कंबर कसली होती. शिक्षक मतदारसंघांमध्ये सातत्याने १८ वर्ष प्रतिनिधीत्व केलेले आमदार कपिल पाटील यांनी आपली उमेदवारी आपले सहकारी सुभाष मोरे यांना दिली आहे. 

शिक्षक भरतीचे अनेक कार्यकर्ते आज सकाळपासून आपल्या नेमून दिलेल्या बुथवर मंगेश नलावडे, शारदा गायकवाड, हेमंत फडतरे पौर्णिमा परळकर ही शिक्षक भारतीची टीम मुंबई उपनगरात कार्यरत होते.तर उद्धव सेनेचे सर्व आमदार,विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख प्रचार यंत्रणेत सहभागी झाले होते. युवा सेना विभाग अधिकारी रमेश वांजळे, उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड, अँड अनिल परब यांचे विश्वासू नेते संजय कदम, यलप्पा कुशालकर, यांची टीम अँड.अनिल परब व ज. मो. अभ्यंकर यांच्यासाठी सकाळ पासून कार्यरत होती. 

या भारतीय जनता पक्षाचे उपनगरातील आमदार अतुल भातखळकर,भाजप विधानपरिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर,आमदार योगेश सागर,आमदार अमित साटम,आमदार अँड.पराग अळवणी,आमदार डॉ.भारती लव्हेकर, आमदार मनीषा चौधरी,आमदार सुनील राणे,आमदार विद्या ठाकूर,तर शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे,माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत आदी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळ पासूनच मतदार केंदावर तळ ठोकून होते.

मतपत्रिका मतपेटीत बंद झालेल्या आहेत.  एक जुलैला मतपेटीतील निकाल जाहीर होईल. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024