शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

पालिका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर सुरक्षारक्षकाकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 22:59 IST

एकीकडे महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिका आयुक्तांकडून पुढाकार घेतला जात असतानाच येथील सुरक्षारक्षकानेच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक

ऑनलाइन लोकमतठाणे, दि.26 -  एकीकडे महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिका आयुक्तांकडून पुढाकार घेतला जात असतानाच येथील सुरक्षारक्षकानेच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ठामपा शाळा क्रमांक १६ मध्ये घडल्याने पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे. पालकांनी शाळा प्रशासनाच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या मोबाइलमध्ये वेगवेगळ्या अश्लील चित्रणांच्या क्लिपिंग मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर या प्रकरणी शाळेच्या मुख्याधिपिकेसह चार शिक्षिकांना महापालिकेने निलंबित केले आहे.विलास शंकर चव्हाण (२५, रा. मुलुंड) असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून तो या शाळेत हंगामी स्वरूपाच्या नोकरीवर एका मुकादमाच्या मदतीने लागला होता. कोपरी गावातील शाळा क्र मांक १६ मध्ये आनंदनगर परिसरातील पीडित दहावर्षीय मुलगी पाचवीत शिकते. २२ आॅगस्ट रोजी सकाळी शाळेत गेल्यानंतर मधल्या सुटीत ती मैत्रिणीसमवेत खेळत होती. त्यावेळी ११.३० वा. च्या सुमारास सुरक्षारक्षक विकास याने त्या दोघींनाही त्याच्या केबिनमध्ये नेले. तिथे दरवाजा आतून बंद करून त्यांना अर्धनग्न करून त्याच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करू लागला. त्यानंतर, शाळेच्या मुख्याध्यापिका किंवा पोलिसांना हा प्रकार सांगितला तर मारण्याची धमकीही त्याने दिली. सुदैवाने त्यातील एका मुलीने तशाही परिस्थितीत रूमची कडी उघडून तिथून धूम ठोकली. त्यापाठोपाठ दुसरीनेही तिथून पळ काढला. आपल्यावर गुदरलेला हा प्रसंग त्यांनी आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्याच मदतीने २५ आॅगस्ट रोजी दुपारी याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पोक्सा, विनयभंग आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मूळ पुण्याचा रहिवासी असलेला हा सुरक्षारक्षक मुलुंडमध्ये आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. त्याच्या मोबाइलमध्ये बऱ्याच अश्लील व्हिडीओ चित्रणाच्या क्लिपिंग मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या क्लिपिंग नेटद्वारे मिळवल्याचेही त्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एम.डी. जाधव हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक विभागाच्या शाळा क्र .१६ मधील ५ वीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सुरक्षा मंडळाचा सुरक्षारक्षक विकास चव्हाण याच्याविरु द्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका अल्पिता तांडेल, शिक्षिका स्मिता सावंत, श्यामल मुणगेकर, आरती तळेकर व माधुरी देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरु द्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.लोखंडी सळईने प्रहार करुन केली सुटका...या दोन्ही मुलींवर अचानक गुदरलेल्या या प्रसंगाने सुरुवातीला त्या भांबावल्या. त्यांच्यापैकी एकीने जवळच पडलेली लहान लोखंडी सळई पाहिली. त्याच्या तावडीतून सुटका करुन तिने त्या लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. हिच संधी साधून दुसरीने त्याचे पाय ओढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.