शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत ‘टॉपर’ झाले ‘काठावर पास’

By admin | Updated: October 23, 2014 04:05 IST

विधानसभा निवडणुकीतील निकालांनी अनेक दिग्गजांची मक्तेदारी मोडीत काढली. गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदारांना विजय मिळविताना मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गौरीशंकर घाळे, मुंबईविधानसभा निवडणुकीतील निकालांनी अनेक दिग्गजांची मक्तेदारी मोडीत काढली. गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदारांना विजय मिळविताना मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई शहरातून २००९ साली काँग्रेसचे कालिदास कोळंबकर सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झाले होते. वडाळ्यातून कोळंबकरांना तब्बल ३०,०३० चे मताधिक्य मिळाले होते. यंदा मात्र कोळंबकरांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. अवघ्या ८०० मतांनी ते कसेबसे विजयी झाले. तर सायन कोळीवाड्यातून १८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या जगन्नाथ शेट्टी यांचा भाजपा उमेदवार कॅ. तमिल सेल्वन यांनी पराभव केला. मुंबादेवीतून काँग्रेस उमेदवार अमिन पटेल यांनी आपली जागा राखली असली तरी त्यांचे मताधिक्य १६ हजारांवरून थेट ८ हजारांवर घसरले. मुंबई उपनगरातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान ३३ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. मुंबई उपनगरातील २६ मतदारसंघांतील हे सर्वाधिक मताधिक्य होते. यंदा खान यांनी २९ हजारांचे मताधिक्य राखले असले तरी ते आठव्या स्थानवर आहेत. तर गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावरील अशोक जाधव २४ हजार मतांनी पराभूत झाले. भांडुप येथील मनसे नेता शिशिर शिंदे यांचे मताधिक्य ३०९४३ होते. तिसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय मिळविणारे शिंदे यंदा पराभूत झाले. मालाड पश्चिमेतून काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी आपली जागा राखली असली तरी २७ हजारांचे मताधिक्य २३०३ वर घसरले. विक्रोळीत मनसेचे मंगेश सांगळे वीस हजारांच्या मताधिक्याने विजयी ठरले होते. यंदा मात्र त्यांना शिवसेनेच्या सुनील राउतांकडून २५ हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. (प्रतिनिधी)