शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टूथपेस्ट, कॉफी कंपन्यांकडून सर्रास ‘मापात पाप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 06:22 IST

एकावर एक फ्रीचा जमाना असल्याने टूथपेस्ट, स्नो पावडर, साबण कंपन्या, डिटर्जंट कंपन्या, कॉफी अशा वस्तूंवर मॉलमध्ये सवलती देत आहेत.

विशाल शिर्के पुणे : एकावर एक फ्रीचा जमाना असल्याने टूथपेस्ट, स्नो पावडर, साबण कंपन्या, डिटर्जंट कंपन्या, कॉफी अशा वस्तूंवर मॉलमध्ये सवलती देत आहेत. दोन वस्तू घेतल्यास तीस ते चाळीस टक्के कमी किमतीत वस्तू मिळते, या मोहापायी अनेकदा मोठा पॅक खरेदी केला जातो. मात्र, मोठ्या पॅकमधून ग्राहकांच्या खिशातून अधिक किंमत वसूल केली जात आहे. वजन मापे कायदा धाब्यावर बसवून काही कंपन्या किमतीच्या तिप्पट रक्कम आकारत असल्याचे निष्पन्न झाले आहे.ग्राहक पंचायतीने नुकतेच दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीचे आणि वजनाचे सर्वेक्षण केले. त्यात वजन व किमतीत तफावत आढळून आली. पंचायतीने प्रथितयश कंपनीची टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधन, आंघोळीचा साबण, पेट्रोलियम जेली, चहा, शॅम्पू, कपड्यावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध १४ उत्पादनांची पाहणी केली. लहान वजनाच्या (पान ५ वर)(पान १ वरून) वस्तूच्या तुलनेत मोठ्या वजनाची वस्तू दीडपट ते तिपटीहून अधिक महाग असल्याचे समोर आले आहे. देशात टूथपेस्ट उत्पादनात वर्चस्व असलेल्या कंपनीची ५० ग्रॅम वजनाची टूथपेस्ट २० रुपयांना, तर दीडशे ग्रॅम वजनाची पेस्ट ९२ रुपायंना विकली जाते. म्हणजेच दीडशे ग्रॅम वजनाची ६० रुपयांची वस्तू ३२ रुपये अधिक किंमतीने विकली जाते. तीचबाब कॉपी, सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू अशा विविध वस्तूंसाठी लागू होते.वैधमापन कायद्याप्रमाणे अर्ध्या किलो वस्तूची किंमत ५० रुपये असेल तर एक किलोच्या वस्तूची किंमत शंभर रुपये असली पाहिजे. मात्र मोठ्या पॅकेटच्या वस्तूंची किंमत अडीचशे पट अधिक असल्याचे समोर आले आहे. मॉल संस्कृती रुजविण्यासाठी कंपन्यांकडून असा खेळ केला जात आहे. त्या विरोधात ग्राहक मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, कॉम्पिटीशन कमिशन आॅफ इंडिया, अ‍ॅडव्हरटायझिंग स्टँण्डर्ड कौन्सिल आॅफ इंडियाकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगरचे अध्यक्ष विजय सागर यांनी दिली.