शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पेट्रोलपेक्षा टोमॅटो महाग

By admin | Updated: July 10, 2017 06:02 IST

महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले

मुंबई/ नागपूर : महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले असून स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाले आहेत. शंभरी गाठल्यामुळे आता टोमॅटो पेट्रोलपेक्षा महाग असल्याची सर्वत्र चर्चा आहे. >दुप्पट भावाने विक्रीसध्या नारायणगाव, मदनफल्ली (आंध्र प्रदेश) आणि नाशिक येथून टोमॅटोची आवक आहे. नागपूर बाजार समितीत ५० ते ६० रुपये घाऊक भाव असला तरी किरकोळ विक्रेते दुपटीने विक्री करीत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज जवळपास ५५० ते ६०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो; परंतु मागील काही दिवसांपासून आवक कमी झाली असून, सरासरी ४०० ते ५०० वाहनांचीच आवक होत आहे. मुंबई, नवी मुंबईकरांसाठी रोज ७०० ते ८०० टन टोमॅटोची गरज असते; परंतु सद्य:स्थितीमध्ये जेमतेम २०० ते ३०० टनच आवक होऊ लागली आहे. परिणामी, बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. १ जुलैला ६ ते १४ रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात होता. तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे दर तब्बल २० ते ५० रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ७० ते १०० रुपये किलो झाले आहेत. एक महिन्यापूर्वी फ्लॉवरची सरासरी १५० ते १७० टन आवक होऊ लागली होती. यामुळे फ्लॉवर फेकून देण्याची वेळ आली होती. १ जुलैला होलसेलमध्ये ५ ते ९ रुपये फ्लॉवरचे दर होते ते आता १५ ते २० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हे दर ६० रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. >कोथिंबीरचे ‘दुहेरी शतक’ : गावरानी कोथिंबीरचे भाव १६० ते १८० रुपये किलो आहे. किरकोळमध्ये २५० रुपये किलोपर्यंत विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लागवड केलेला माल संपत आल्यामुळे व नवीन पीक आले नसल्याने, राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली असून, बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये अनेक भाज्यांचे दर वाढल्याने किचनचे बजेट दुप्पट झाले आहे.