शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

टमाटर, कोथिंबीर, मिरची @ १००!

By admin | Updated: August 7, 2014 00:58 IST

उशिरा आलेल्या जोरदार पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. टमाटर आणि कोथिंबीरने स्वयंपाकघरातून एक्झिट घेतली आहे.

भाज्या ‘तिखट’ : गृहिणींचे बजेट बिघडलेनागपूर : उशिरा आलेल्या जोरदार पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. टमाटर आणि कोथिंबीरने स्वयंपाकघरातून एक्झिट घेतली आहे. किरकोळ बाजारात तिन्ही भाज्या प्रति किलो १०० रुपयांवर आहेत. एकंदरीत भाज्या ‘तिखट’ झाल्या आहेत. टमाटरची आवक घटली असून कडक भाव आणखी काही दिवस राहतील. महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत असून दरदिवशी जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे. नवीन लागवड आॅगस्टपासून सुरू झाली असून नवीन माल बाजारात येईपर्यंत ग्राहकांना भाज्या महागच मिळतील. केवळ वांगे, पत्ताकोबी, पालक, कोहळे या भाज्यांचे दर आटोक्यात असून बहुतांश भाज्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. स्वयंपाकघरात कडधान्याचा वापर होऊ लागला आहे. आवक कमी असल्याने किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग असल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. स्थानिक व बाहेरून आवक कमीकॉटन मार्केट ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मगनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे.गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरव्या मिरचीची आवक आहे. नागपूरलगतच्या परिसरातून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारले आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत. या बाजारातून अन्य ठिकाणी भाज्या विक्रीसाठी जात असल्याने सध्या भाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे अडतियांनी सांगितले.