शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टोलपोटी १४५ कोटींचा भुर्दंड, मोदींच्या नोटाबंदीचा ठाणे जिल्ह्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:40 IST

गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या

नारायण जाधवठाणे : गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या, यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सर्व टोलनाक्यांवर ९ नोव्हेंबर २०१६ ते २ डिसेंबर २०१६ या काळाकरिता सर्व वाहनांना पथकरातून सूट दिली. या २४ दिवसांत टोल वसूल करणाºया कंपन्यांचे जे नुकसान झाले होते, त्याची भरपाई म्हणून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता संबंधित कंपन्यांना १४४ कोटी ६८ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या १९ टोलनाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या १४ टोलनाक्यांचा समावेश आहे. केंद्राच्या निर्णयामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला टोलच्या भरपाईपोटी हा भुर्दंड बसला आहे. यात सर्वाधिक टोलनाके ठाणे जिल्ह्यातील आहेत.या २४ दिवसांसाठी मुंबईच्या वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर या प्रवेशद्वारावरील टोलसाठी प्रतिदिन १ कोटी १५ लाख, मुंबई-पुणे महामार्गावर (दोन्ही मार्ग) मिळून दररोज २ कोटी, ठाणे-घोडबंदर रोड टोलनाक्यावर दररोज १३ लाख ५० हजार, भिवंडी -कल्याण-शीळफाटा टोलनाक्यासाठी प्रतिदिन साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. हे सर्व टोलनाके रस्ते विकास महामंडळाच्या मालकीचे आहेत. याशिवाय राज्यातील इतर ९ मार्गांचाही समावेश आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या ठाणे-भिवंडी-वडपा टोलनाक्यावर दररोज १० लाख ८० हजार,अंजुर ते मानकोली रस्ता - ५ लाख ८७ हजार, मनोर-वाडा मार्गावर १५ लाख ४२ हजार आणि सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाक्यावरील प्रतिदिन भरपाईपोटी ३९ हजार ८१ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय राज्यातील इतर १५ टोलनाक्यांनाही भरपाई देण्यात येणार आहे.टोल कंपन्यांना २०३७पर्यंत ८१३१.३७ कोटी देण्याचा निर्णयजनतेचा असंतोष लक्षात घेऊन शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या २७ टोल नाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या २६ टोलनाक्यांवर एसटी, जीप, कार व तत्सम वाहनांना पथकरातून सरसकट सूट दिली आहे. त्यांच्या नुकसानभरपाईपोटी संबंधित कंपन्यांना २०१५-१६ ते २०१३६-३७पर्यंत ८१३१ कोटी ३७ कोटींची भरपाई देण्याचाही निर्णयही शासनाने घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम ७३३७ कोटी ४४ लाख तर रस्ते विकास महामंडळ ७५३ कोटी ९३ लाख रुपये भरपाई अटी व शर्ती ठेवून देणार आहे.