शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

टोलमाफी १ जूनपासून

By admin | Updated: May 30, 2015 01:15 IST

राज्यातील १२ टोलनाके येत्या सोमवार १ जून पासून बंद करण्याचा तर ५३ नाक्यांवर कार, जीप व एस.टी. बसेसना टोलमधून सूट देण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे.

१२ टोलनाके बंद : ५३ नाक्यांवर कार, जीप, एसटीला सूटमुंबई : राज्यातील १२ टोलनाके येत्या सोमवार १ जून पासून बंद करण्याचा तर ५३ नाक्यांवर कार, जीप व एस.टी. बसेसना टोलमधून सूट देण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती. राज्यात टोलमुक्ती करण्याच्या दिशेने सरकारने हे पहिले पाऊल टाकले असले तरी मुंबईतील प्रवेशद्वारांवर आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोलबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ११ टोल नाके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील एक टोल नाका असे एकूण १२ टोल नाके १ जून २०१५ पासून (३१ मेच्या रात्री १२ वाजल्यानंतर) बंद करण्यात येत आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २७ टोल नाके व रस्ते विकास महामंडळाकडील २६ टोल नाके अशा एकूण ५३ टोल नाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसन सूट देण्याचाही निर्णय झाला आहे. या टोलनाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र दोन मार्गिका ठेवण्यात याव्यात आणि वाहनांना पथकरातून सूट असल्याचे फलक लावण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग१) अलिबाग-पेण-खोपोली रस्ता -वडखळ नाका २) वडगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता - शिक्रापूर नाका ३) मोहोळ-कुरुळ-कामती रस्ता - मोहोळ नाका ४) वडगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता- भंडाराडोंगर नाका ५) टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर रस्ता - कुसळब नाका ६) अहमदनगर-कर्माळा-टेंभूर्णी रस्ता - अकोले नाका ७) नाशिक-वणी रस्ता -ढकांबे, नांदुरी नाका आणि सप्तश्रृंगी गड चेक नाका ८) भुसावळ-यावल-फैजपूर रस्ता- तापीपुलाजवळील नाका ९) खामगाव वळण रस्ता -रावणटेकडी नाका. अशाप्रकारे नऊ रस्त्यांवरील ११ नाके बंद करण्यात येणार आहेत.राज्य रस्ते विकास महामंडळ१) रेल्वे ओव्हरब्रिज तडाली (जि.चंद्रपूर) - तडाली टोलनाका.या पथकर नाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेसना टोल लागणार नाही- (सार्वजनिक बांधकाम विभाग) १) भिवंडी-वडपे रस्ता - कशेळी गावाजवळील नाका २) चिंचोटी-कामण-पायगाव रस्ता- मालोडी गाव नाका ३) मनोर-वाडा-भिवंडी रस्ता - वाघोटे आणि कवाड नाका ४) सायन-पनवेल विशेष राज्य रस्ता -पुणे दिशेकडील दोन्ही नाके ५) नाशिक-निफाड-औरंगाबाद रस्ता - शिलापूर आणि अंदरसूल नाका ६) अहमदनगर-वडाळा-औरंगाबाद रस्ता- शेंडीजवळील नाका ७) अहमदनगर-वडाळा-औरंगाबाद - खडकाफाटा आणि लिंबे नाका ८) अहमदनगर-कोपरगाव रस्ता - देहरे गावाजवळील नाका ९)पुणे-अहमदनगर रस्ता-म्हसणे फाटा नाका १०) प्रकाशा-छडवेल-सोग्रस-सटाणा-दहीवेल रस्ता -भाबडबारी नाका ११) चांदवड-मनमाड-नांदगाव रस्ता - दुगाव आणि पानेवाडी चेकपोस्ट नाका १२) मालेगाव-मनमाड-कोपरगाव रस्ता- येसगाव नाका १३) औरंगाबाद-जालना रस्ता- लाडगाव आणि नागेवाडी नाका १४) नांदेड-नरसी रस्ता- बरबडा नाका १५) शिरुर-ताजबंद-मुखेड-नरसी-बिलोली रस्ता - तिन्ही नाके १६) जालना-वाटूर रस्ता- पिंपरी फाटा नाका १७) मलकापूर-बुलडाणा-चिखली रामा रस्ता -दोन्ही टोलनाके. १८) जाम-वरोरा रस्ता - आरंभा गावाजळील नाका १९) वरोरा-चंद्रपूर-बामणी रस्ता - नंदुरी आणि विसापूर नाका.रस्ते विकास महामंडळाचे रस्ते१) रेल्वे ओव्हरब्रिज दौंड - दौंड नाका २) रेल्वे ओव्हरब्रिज केडगाव -केडगाव नाका ३) रेल्वे ओव्हरब्रिज मुर्तिजापूर - मुर्तिजापूर नाका ४) एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प औरंगाबाद रस्ता -सांगवी-औरंगाबाद-जवगाव नाका, नक्षत्रवाडी-औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील नाका आणि लासूर-औरंगाबाद रस्त्यावरील नाका.५) एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प नागपूर - काटोल रोडवरील नाका, उमरेड रोडवरील नाका, हिंगणा रोडवरील नाका आणि हिंगणा रोड ते अमरावती रोडवरील नाका. ६) एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प सोलापूर - सोलापूर-होटगी रस्त्यावरील नाका, सोलापूर-बार्शी रस्त्यावरील नाका, सोलापूर-देगाव रस्त्यावरील नाका, सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील नाका ७) एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प बारामती- भिगवण-बारामती रस्त्यावरील नाका, इंदापूर-बारामती रस्त्यावरील नाका, निरा-बारामती रस्त्यावरील नाका, मोरगाव-बारामती रस्त्यावरील नाका, पायस-बारामती रस्त्यावरील नाका ८) चाळीसगाव वळण रस्ता व उड्डाणपुल - चाळीसगाव नाका ९) ठाणे-घोडबंदर रस्ता - गायमुख नाका १०) चिमूर-वरोरा-वणी रस्ता - दोन्ही नाके ११) नागपूर-काटोल-जलालखेडा - काटोल नाका १२) भिवंडी-कल्याण-शिळ रस्ता - काटई गावाजवळील आणि गोवे गावाजवळील नाका. -असे एकूण १२ प्रकल्पांवरील २६ पथकर नाक्यांवर कार, जिप आणि एसटी बसेसना टोल लागणार नाही.