पुणे : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येला उद्या (मंगळवारी) एक वर्ष पूर्ण होत आहे. हत्याराने विचार मोडू शकत नाही, या विचाराच्या समर्थनार्थ कलबुर्गी यांच्या स्मृतीदिनी धारवाडमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये देशभरातील १२० संघटनासह अंतरा देव सेन, पत्रकार कुमार केतकर, सिद्धार्थ वरदराजन, लेखक राजन खान यांच्यासह साहित्य, सामाजिक व कला क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेशदेवी यांनी दिली. (प्रतिनिधी)
कलबुर्गी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मूकमोर्चा
By admin | Updated: August 30, 2016 06:07 IST