शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:57 IST

जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झाले याचा तपशील अद्याप समोर आला नाही मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच या भेटीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे...

राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीव गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र असे असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (गुरुवार) वांद्रे येथील ताज लँड्स अँडमध्ये बैठक पार पडली. जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झाले याचा तपशील अद्याप समोर आला नाही मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच या भेटीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना ऑफर 'पेश' केली आहे. 

शिरसाट म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज जी भेट झाली. त्याला निश्चितपणे राजकीय अर्थही आहे. मात्र, राज ठाकरे जेव्हा भेटतात, तेव्हा त्यांच्या काही सूचना आणि आमेही असतात. त्या दृष्टीनेही ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याचे महानगर पालिकेचे समिकरणं काय होतील? अथवा उद्याची राजकीय परिस्थिती काय असेल? यावर आताच्या घडीला भाष्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या भेटीनंतर, त्यासंदर्भातील जो काही खुलासा आहे, तो मुख्यमंत्री स्वतः अथवा राज साहेब स्वतः करतील." शिरसाट छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांसोबत बोलत होते.

दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "राजकारणात, निवडणुकीत कोण कुणाबरोबर आहे? कुणाची कुणाबरोबर युती होते? हे जोवर नक्की होत नाही. तोवर असे यू टर्न्स आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतील. यामुळे यामुळे आजच्या भेटीचा थेट संबंध लावणे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसांतच आपल्याला लक्षात येईल."

"राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. यामुळे एक पक्ष वाढवण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी अशा युत्या कराव्या लागतात. मला वाटते की, राज साहेबांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती. आजही आमची ऑफर आहे. त्यांच्याकडे असलेले वक्तृत्व पाहता, ते चांगल्या प्रकारे महानगर पालिकांच्या निवडणुका लढू शकतात. त्यांनी सोबत यावे, अशी आमचीही त्यांना विनंती आहे," असेही शिरसाट म्हणाले.

 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना