मुंबई : अंधेरीच्या राजाची सोमवारी सायंकाळी ६ वाजता आझादनगर येथून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. १९ तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे मंगळवारी दुपारी वेसावे समुद्रात विसर्जन करण्यात येईल. माजी नगरसेवक मोतीराम भावे कुटुंबाने पूजा केल्यानंतर वेसावे येथील मांडवी गल्ली जमात विसर्जन मंडळातर्फे विसर्जन सोहळा रंगेल, अशी माहिती आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर फणसे, खजिनदार सुबोध चिटणीस आणि सहखजिनदार सचिन नायक यांनी दिली. मिरवणुकीसाठी आझादनगर, विरा देसाई रोड, आंबोली, एस.व्ही. रोड, अंधेरी मार्केट, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, वेसावे येथे विद्युत रोशणाई करण्यात येत आहे. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष केशव तोंडवलकर आणि सचिव विजय सावंत यांनी सांगितले. दरम्यान, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अनिल कपूर, रविना टंडन, तुषार कपूर, उर्वशी रोटेला, रोहित शेट्टी, सोहा अली खान यांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले आहे. खासदार गजाजन कीर्तिकर, महापौर स्नेहल आंबेकर, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार भारती लव्हेकर, युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्र्तिकर यांनी राजाचे दर्शन घेतले.>ठिकठिकाणी रोशणाईमिरवणुकीसाठी आझादनगर, विरा देसाई रोड, आंबोली, एस.व्ही. रोड, अंधेरी मार्केट, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, वेसावे येथे विद्युत रोशणाई करण्यात येत आहे. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने दिली.
अंधेरीच्या राजाची आज विसर्जन मिरवणूक
By admin | Updated: September 19, 2016 01:45 IST