लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मंगळवार, ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार आहे. सोहळ्याला राज्यभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीच्या वतीने गडावर ५ व ६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात गडपूजनाने होणार आहे. ६ जूनला पहाटे गडावरील नगारखान्यासमोर ध्वजारोहण, त्यानंतर संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे. या वेळी शिवरायांच्या उत्सवमूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गडावर काढण्यात येणारा पालखी सोहळा कार्यक्र माचे खास आकर्षण ठरणार आहे.
रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन
By admin | Updated: June 6, 2017 05:54 IST