शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार

By admin | Updated: August 19, 2016 01:13 IST

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून १९ आॅगस्टपासून प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा आणि विषय

मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून १९ आॅगस्टपासून प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा आणि विषय यात बदल करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना या विशेष यादीत बदलाची संधी मिळणार आहे. सोबत ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीला प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनाही या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे.पहिल्या विशेष यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट प्रवेश अर्ज भरले होते, त्यांना दुसऱ्या विशेष यादीसाठी नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याउलट पहिल्या विशेष यादीअखेर नाखूश असलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार आहे. मंगळवारपासून लॉगइन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवर लॉगइन आयडी, पासवर्डसह प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरावा लागेल. २० आॅगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.दुसऱ्या विशेष यादीची गुणवत्ता यादी २३ आॅगस्टला जाहीर होणार आहे. जे विद्यार्थी प्रवेशामुळे संतुष्ट नसतील, त्यांनी रिक्त जागांची माहिती घेऊनच अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय पसंतीक्रम अर्ज भरताना अडचण असल्यास मार्गदर्शन केंद्रांची मदत घ्यावी, असेही प्रशासनाने सांगितले.६०% पेक्षा कमी गुण मिळवलेल्या म्हणजेच फर्स्ट क्लास नसलेल्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांची नावे भरण्याची अट आहे.