शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

कोकणात आज मराठा समाज एकवटणार, भव्य मोर्चाचं आयोजन

By admin | Updated: October 23, 2016 08:46 IST

कोकणात पालघर, रायगड, सिंधुदुर्गात आज मराठा समाजाचे भव्य मोर्चे निघणार आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - अनेक जिल्ह्यांत यशस्वी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आज कोकणात धडकणार आहे. कोकणात पालघर, रायगड, सिंधुदुर्गात आज मराठा समाजाचे भव्य मोर्चे निघणार आहेत. यानिमित्तानं मराठा समाज सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये एकवटणार आहे. रायगडच्या माणगावजवळील निजामपूर रोडवरून या भव्य मोर्चाची सुरुवात होणार आहे. या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक आमदार हजेरी लावणार आहेत.तर आगरी, आदिवासी, शिलोत्तरी, मच्छीमार, मुस्लीम आदी समाजांचे प्राबल्य असलेल्या पालघरमध्येही मराठा बांधव विक्रमी मोर्चा काढणार आहेत. दुपारी १ वाजता स.तु. कदम हायस्कूलच्या मैदानावरून सुरू होणारा मोर्चा दुपारी ३ च्या सुमारास आर्यन विद्यालयाच्या मैदानावर पोहोचणार आहे. एक लाखांची क्षमता असणारे हे मैदान व आसपासचा परिसरही हा मोर्चा व्यापून टाकण्याची शक्यता आहे. या मोर्चाला आगरी समाज, मुस्लीम समाज यांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. सकाळी ९ पासूनच संपूर्ण जिल्ह्यातून व आसपासच्या परिसरातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव स. तु. कदम विद्यालयाच्या प्रांगणात जमण्यास सुरुवात होणार आहे. मोर्चा सुरू होईपर्यंत काही वक्ते या समुदायासमोर मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासावर भाषणे करणार आहेत. यातील वक्ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज व अन्य ऐतिहासिक विषयांवर अल्प काळ आपले विचार मांडतील. वक्ते व यांच्या भाषणाचा विषय याची पूर्णपणे खातरजमा करून त्यांची वेळ संयोजकांनी निश्चित केली आहे. यात कोणताही वक्ता राजकीय भाषणे, आरोप, प्रत्यारोप, टीका, टिप्पणी करणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे.तर दुसरीकडे सिंधुदुर्गात ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नारायण राणे सहभागी होणार आहेत. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईकही या मोर्च्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि अँब्युलन्सही दाखल झाल्या आहेत. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडूनही सभास्थळाची तपासणी करण्यात आली आहे. या मोर्च्यात लाखोंच्या संख्येनं मराठी बांधवांसह सामाजिक आणि राजकीय पुढारीही सहभागी होणार आहेत.