मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर डाव्यांनी रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियासह सर्व डाव्या आणि पुरोगामी संघटनांसह गिरणी कामगारांनीही पाठिंबा दर्शविला आहे.पुरोगामी महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येकाने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केले विशेषत: बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे परीक्षार्थिंना त्रास होऊ नये, म्हणून रविवारचा दिवस निवडला असून सर्व नागरिकांनी अहिंसात्मक मार्गाने निषेध नोंदवावा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव भालचंद्र कांगो यांनी केले आहे. (प्रतिनिधी)राज्याला पुरोगामी म्हणणे बंद करा !कॉम्रेड गोविंद पानसरेंचे विचार पुढे नेणार असा निर्धार करीत धर्मनिरपेक्ष, समतावादी चळवळीने रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यातून धर्मांध शक्तींना विरोध केला जाईल़ आधी नरेंद्र दाभोलकर आणि आता पानसरे यांच्या हत्येमुळे राज्याला पुरोगामी म्हणणे बंद करायला हवे. कॉम्रेड पानसरे अलीकडे प्रत्येक व्याख्यानात हीच भूमिका मांडत होते, अशा डावे नेते प्रकाश रेड्डी व सीपीआयचे सचिव विश्वास उटगी यांनी भावना व्यक्त केल्या.
हत्येच्या निषेधार्थ आज विरोधकांचा महाराष्ट्र बंद
By admin | Updated: February 22, 2015 02:06 IST