शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

टीएमटीचे प्रशासनही काढा भंगारात

By admin | Updated: July 18, 2016 03:14 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा मिळावी, म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी महापालिकेची स्वत:ची अशी हक्काची ठाणे परिवहन सेवा सुरू केली.

अजित मांडके,

ठाणे- ठाणेकरांना उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा मिळावी, म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी महापालिकेची स्वत:ची अशी हक्काची ठाणे परिवहन सेवा सुरू केली. परंतु, आज या सेवेचा पूर्र्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे. प्रवाशांना वेळेवर बस न मिळणे, कर्मचाऱ्यांची थकबाकी, वागळे, कळवा आणि लोकमान्य आगारांची झालेली दुरवस्था, बसदुरुस्तीसाठी लागणारे साहित्य अपुरे, कर्मचाऱ्यांकरिता कोणत्याही सुविधा नाही, थकबाकी, १७ वर्षांपासून ४५ कर्मचारी कंत्राटी स्वरूपात, कार्यशाळेच्या छताला, गळती, कर्मचाऱ्यांना वेळेवर बस उपलब्ध न होणे, अपुरे मनुष्यबळ, बढती न मिळणे, कामाच्या ठिकाणची जागा योग्य नसणे यांसह इतर सर्वच पातळ्यांवर ठाणे परिवहन सेवा सपेशल अपयशी ठरली आहे. त्यामुळे परिवहन आगारच नाही, तर परिवहन प्रशासनही आता भंगारात काढा, असा सूरच ‘लोकमत’च्या आॅन दी स्पॉट रिपोर्टरच्या पाहणीतून उमटला आहे. असे असतानाही परिवहन ही बेस्टमध्ये विलीन न करता ती सक्षम करण्याचा दावा मात्र लोकप्रतिनिधी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परिवहनची मुहूर्तमेढ ९ फेब्रुवारी १९८९ रोजी झाली. सुरुवातीला पाच बस असताना काही काळातच या बस २५ च्या घरात गेल्या, तर कर्मचाऱ्यांची संख्या ही ७० च्या आसपास होती. परंतु, ठाण्याची लोकसंख्या वाढत गेली आणि आजघडीला परिवहनच्या ताफ्यात रेकॉर्डवर ३६३ बस दाखवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ३१३ बस ताफ्यात आहेत. असे असले तरीही रस्त्यावर मात्र त्यातील १८० ते १९० बस रोज धावतात. वाढत्या लोकसंख्येला या बस अपुऱ्या पडत आहेत. परिवहनचे आजघडीला ६५ मार्ग असून २३०० च्या आसपास कर्मचारी आहेत. परंतु, आजही वाहकांची कमतरता परिवहनला जाणवत आहे. त्यामुळेच नव्याने दाखल होणाऱ्या १९० बस आजही दाखल झालेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांची १०० कोटींहून अधिक थकबाकी, धुलाई, सुटीचा भत्ता यासह इतर भत्तेही प्रलंबित आहेत. पाचव्या, सहाव्या वेतन आयोगांतील फरकही अद्याप कर्मचाऱ्यांच्या हाती नाही. विशेष म्हणजे कार्यशाळेची दुरवस्था असतानाही परिवहन व्यवस्थापक येथे फिरकतच नसल्याचा आरोप कर्मचारी दबक्या आवाजात करीत आहेत. कार्यशाळा विभागातील प्रत्येक दुरुस्तीच्या इमारतींचीदेखील अवस्था दयनीय झाली असून त्या केव्हाही पडू शकतात, अशी परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या इमारतींचीही दुरवस्था असून तेथे अनेक सोयीसुविधांची वानवा आहे. कर्मचाऱ्यांना बरे वाटावे म्हणून अर्धवट रंगरंगोटी केली आहे. स्वच्छतागृहांची अगदी दुरवस्था झाली असून तेथेच कर्मचाऱ्यांना घाणीत डबे खावे लागत आहेत. भंगाराच्या ढिगाऱ्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून दुरुस्तीच्या काही विभागांत पावसाचे पाणी शिरून तेथे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती झाल्याने कर्मचारी आजारी आहेत.