शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडर अखेर बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 16:19 IST

दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकही स्पर्धक यामध्ये सहभागी न झाल्याने अखेर ठाणे महापालिकेने ग्लोबल टेंडर बासणात गुंडाळले असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने देखील पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरु केली होती. परंतु दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकही स्पर्धक यामध्ये सहभागी न झाल्याने अखेर ठाणे महापालिकेने ग्लोबल टेंडर बासणात गुंडाळले असल्याची माहिती समोर आली आहे.  

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाच लाख लसींसाठी ५० कोंटीचे ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रक्रिया सुरु केली होती. त्यासाठी ८ जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. पालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागविले आहे. २६ मे पासून ही निविदा बोली लावण्यासाठी खुली करण्यात आली होती. त्यानुसार यासाठी ८ जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिके प्रमाणो ठाणोकरांना लस मिळावी या उद्देशाने जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने देखील ग्लोबल टेंडर काढावे, असे आदेश दिले होते. 

त्यानुसार ठाणे महापालिकेने हे टेंडर काढले. त्यानुसार उत्पादन क्षमता त्यांनाच यात सहभागी होता येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याअनुषंगाने कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक या लसींचे उत्पादक, त्यांचे भारतातील भागिदार, पुरवठादार, वितरक यांनाच हे देकार भरता येण्यासारखे होते. तसेच लसपुरवठ्याचा अनुभव असलेल्या कंपन्या आणि वितरकांनाच देकार भरता येणार होते, स्वारस्य देकार सादर झाल्यानंतर पालिकेची निविदा कमिटी तांत्रिक आघाड्यांवर त्यांची तपासणी करणार, सर्व अटी - शर्तीची पुर्तता करणाऱ्या निविदाकारांचे आर्थिक देकार उघडले जाऊन, त्यात कमी बोली लावणाऱ्या, तसेच कमीत कमी वेळेत लसपुरवठ्याची तयारी दाखविणाऱ्या उत्पादन किंवा वितरकांची निवड केली जाणार होती.

परंतु आता पालिकेने काढलेल्या या निविदेला एकही स्पर्धक आला नाही. त्यामुळे पालिकेने पुन्हा याला दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु तरी देखील एकही स्पर्धक न आल्याने अखेर ठाणे  महापालिकेने ही निविदा प्रक्रियाच रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. ग्लोबल टेंडरला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु त्याला एकही स्पर्धक आलेला नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. - गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसtmcठाणे महापालिका