शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील टीपू सुल्तानचे स्मारक हटविले; नितेश राणेंनी मानले फडणवीसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 09:58 IST

काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि टीपू सुल्तानचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात वातावरण तापलेले होते. यावर फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता.

शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील टिपू सुलतान यांचे स्मारक अखेर शुक्रवारी पहाटे ठेकेदारानेच हटविले. यामध्ये प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. खबरदारीचा उपाय म्हणून आमचा केवळ शेडो वाॅच होता. शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील टिपू सुलतान यांचे स्मारक प्रशासनाकडून हटविण्यात आले नाही. ज्या ठेकेदाराने ते स्मारक बांधले होते. त्यांनीच शुक्रवारी पहाटे ते स्मारक हटविले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. एआयएमआयएमचे आमदार फारूक अन्वर शाह यांनी धुळ्यातील एका चौकात टीपू सुल्तानचे स्मारक उभारल्याची तक्रार भाजयुमोने केली होती. यानंतर हे स्मारक हटविण्यात आले आहे. 

भाजपाच्या युवा मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिली होती. याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, धुळे पालिकेलाही पत्र लिहून हे स्मारक हटविण्याची मागणी करण्यात आली होती. याची तक्रार प्राप्त झाल्यावर अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. 

काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि टीपू सुल्तानचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात वातावरण तापलेले होते. यावर फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता. धुळ्यातील १०० फुटी रोडवर या स्मारकाचे बांधकाम करण्यात आले होते. ते पाडण्यात आल्याबद्दल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

प्रशासनाने आमदार शाह यांच्यासोबत चर्चा करून हे प्रकरण मिटविले आहे. या पार्श्वभूमीवर धुळ्यात सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे