शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

इस बार उनको जेल दिखाना पडेगा...

By admin | Updated: January 13, 2015 05:00 IST

लालबाग परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर अफवांचे पीक पेरून शहरातील तणाव वाढवणा-यांविरोधात ‘इस बार तो उनको जेल दिखाना पडेगा’

मुंबई : लालबाग परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर अफवांचे पीक पेरून शहरातील तणाव वाढवणा-यांविरोधात ‘इस बार तो उनको जेल दिखाना पडेगा’, अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घेतली आहे. कठोर कारवाई हेच अफवा पसरविणाऱ्यांना चोख उत्तर आहे. एसएमएस करून नामनिराळे राहू, अशा धुंदीत असणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील तेव्हाच समाजाला योग्य संदेश मिळेल आणि भविष्यात अफवा पसरविण्याआधी शंभरवेळा विचार केला जाईल, असे मारिया यांनी सांगितले. ४ जानेवारीला ईद ए मिलादच्या दिवशी लालबाग परिसरात दोन गटांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. मात्र हे निमित्त साधून घटनेचे अतिरंजित एसएमएस धाडले गेले. हळूहळू अफवांसोबत चिथावणीखोर मजकुरांना पाय फुटले आणि क्षणात शहरातले वातावरण तणावपूर्ण बनले. त्याचे पडसाद मध्य मुंबईत उमटले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून मारिया यांनी अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भोईवाडा पोलीस ठाण्यात अफवा पसरविणाऱ्यांविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारिया यांच्या माहितीनुसार एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवरून सर्वाधिक अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे या तिन्ही माध्यमांचा तपास सुरू आहे. यासाठी या माध्यमांची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून तसेच केंद्रीय यंत्रणांकडून सहकार्य घेतले जात आहे. मुंबई पोलीस दलातील सायबर पोलीस, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.अफवांचा एसएमएस सर्वात आधी कोणी धाडला याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेलच. पण मधल्या मध्ये ज्या कोणी तो वाचून पुढे पाठवला त्यांनाही कारवाईला सोमोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अफवा जाणूनबुजून?जातीय सलोखा बिघडावा, या हेतूने जाणुनबुजून अफवा पसरविण्यात आल्या, असा संशयही आयुक्त मारिया यांनी व्यक्त केला. मात्र जोवर तपास पूर्ण होत नाही तोवर काही ठामपणे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर अल्पसंख्याक आयोगाने आयुक्तांना पत्र धाडून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला होता. (प्रतिनिधी)