शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

देशाच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:23 IST

नाशिक : शेतकºयांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत त्यांची थट्टा करून शेतमालाच्या किमतीशी खेळ करणाºया सत्ताधारी सरकार व त्यांच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ आली आहे. मी शेतकरी चळवळीच्या पाठीशी राहणार नाही तर सोबत राहून शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी लढा देईल, असे रोखठोक मत देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ...

ठळक मुद्देपंतप्रधानांनी वर्षभरापूर्वी रात्री देशाला संबोधित करत नोटाबंदीची घोषणा करून एकप्रकारे झटका दिला.काळा पैसा साठवणूक करणाºयांचे सरकारमध्ये लागेबांधे असल्यामुळे त्यांनी नोटाबंदीअगोदरच ‘तजवीज’ करून घेतली नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. फडणवीस सरकारची ‘सरसकट क र्जमाफी’ची घोेषणा सरसकट फसवी असून केवळ भूलथापा आहेत.या सरकारला आणि राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही

नाशिक : शेतकºयांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत त्यांची थट्टा करून शेतमालाच्या किमतीशी खेळ करणाºया सत्ताधारी सरकार व त्यांच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ आली आहे. मी शेतकरी चळवळीच्या पाठीशी राहणार नाही तर सोबत राहून शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी लढा देईल, असे रोखठोक मत देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.नाशिक येथे किसान सभेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वनधिपती विनायकदादा पाटील, शंकर अण्णा धोंडगे, दत्ता पवार, हेमराज कोर, किशोर माथनकर, आमदार पंकज भुजबळ, आमदार दीपिका चव्हाण, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, पंतप्रधानांनी वर्षभरापूर्वी रात्री देशाला संबोधित करत नोटाबंदीची घोषणा करून एकप्रकारे झटका दिला. त्याचवेळी शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसली; मात्र सुरुवातीला ती कोणी बोलून दाखविली नाही, पण जास्त दिवस ती पोटात ठेवता येणारी नव्हती, त्यामुळे आता सर्वच स्तरातून नोटाबंदीविरुद्ध आवाज उठू लागला आहे. काळा पैसा देशात आला नाही आणि काळा पैसा साठवणूक करणाºयांचे सरकारमध्ये लागेबांधे असल्यामुळे त्यांनी नोटाबंदीअगोदरच ‘तजवीज’ करून घेतली. नोटाबंदीनंतर मात्र सर्वसामान्य माणूस रणरणत्या उन्हात अन् थंडीत लांबलचक रांगेत एटीएम अन् बॅँकांच्या उंबरठ्याबाहेर उभा राहिल्याचे चित्र संपूर्ण भारताने बघितले. या नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. फडणवीस सरकारची ‘सरसकट क र्जमाफी’ची घोेषणा सरसकट फसवी असून केवळ भूलथापा आहेत. सरकार शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव द्यायला तयार नाही की कर्ज माफ करायला तयार नाही. त्यामुळे या सरकारला आणि राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, असे ते म्हणाले. केवळ शेतकºयांचे नव्हे तर शेतमजुरांपासून तर शेतीशी संबंधित साधनसामग्रीवरील कर्जही सरकारने माफ करावे, असे यावेळी पवार यांनी ठणकावून सांगितले.

अधिवेशनामधील ठराव असे...

  • सरकारचे निचांकी धोरण शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्येस जबाबदार असून, २०१७ पर्यंतचे सर्व कर्ज सरकारने माफ करावे.
  •  शेतीमालाच्या उत्पादन खर्चानुसार शेती पिकाला हमीभाव मिळवून देण्यासाठी सरकारने कटिबद्ध रहावे.
  • तारण जमिनीच्या ७० टक्के कर्जपुरवठा सरकारने शेतकºयांना द्यावा.
  •  शेतकरी-शेतमजुरांना कायद्यानुसार आर्थिक-सामाजिक सुरक्षा प्रदान करावी.
  • मनरेगाअंतर्गत शेतीची सर्व कामे केली जावी.
  •  बेरोजगार तरुणांना किमान गरजा भागविण्यासाठी सरकारने मानधन द्यावे.
  •  शेतकरी व शेतीसाठी केलेल्या तरतुदींचा स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करावा.
  •  शेतकºयांच्या न्यायहक्काच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता राज्यातील बळीराजा सरकारविरुद्ध असहकार पुकारत आहे.

बळीराजाला आत्महत्या शोभत नाहीबळीराजा हा संघर्ष व कष्टाच्या बळावर शेती फुलवितो. त्याच्या रक्तात जिद्द, संघर्षाची ताकत अन् आत्मविश्वास आहे. यामुळे आत्महत्येच्या रस्त्यावर शेतकºयांनी जाता कामा नये तर या सरकार आणि व्यवस्थेविरुद्ध सामूहिक ताकदीने लढा द्यावा. शेतकºयाला संघर्ष अन् क ष्ट शोभतात आत्महत्या नाही, असे यावेळी शरद पवार यांनी शेतकºयांना एकप्रकारे दिलासा देणारे आवाहन केले.