शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

'अंधेरीच्या राजा'ला यंदा कुणकेश्वर मंदिराचा देखावा

By admin | Updated: September 7, 2016 19:52 IST

नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम उपनगरातील अंधेरी (प.) येथील अंधेरीच्या राजाने यंदा ५१व्या वर्षात पदार्पण केले

मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 7 - नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम उपनगरातील अंधेरी (प.) येथील अंधेरीच्या राजाने यंदा ५१व्या वर्षात पदार्पण केले असून,  परळ रेल्वे वर्कशॉपमधील प्रसिद्ध मूर्तिकार राजन खातू यांनी ८.५ फुटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती तयार केली आहे. यंदा अंधेरीचा राजा प्रसिद्ध कोकणातील कुणकेश्वर मंदिरात विसावला आहे.

१९७४ पासून अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन होते.यंदा देखिल प्रसिद्ध कला दिग्दर्शक धर्मेश शहा यांच्या शंकल्पनेतून सुमारे २५० कलाकारांनी गेली दोन महिने अहोरात्र काम करून आपल्या कलाकुसरी आणि कोरीव कामांमधून कोकणातील देवगडपासून १६ किमी अंतरावर असलेल्या कुणकेश्वर मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला आहे अशी माहिती समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांनी दिली.यंदाही देखिल आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीने ड्रेस कोड लागू केला आहे.तोकडे कपडे,मिनी स्कर्ट,आणि सिवलेस कपडे घालून येणाऱ्या गणेश भक्तांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही.आपल्या संस्कृतीचे पालन आणि अंधेरीच्या राजाचे पावित्र्य लक्षात घेता समितीचे श्री.यशोधर(शैलेश)फणसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ड्रेस कोड २०१२ साली येथे लागू केला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष केशव तोंडवलकर आणि खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली.ड्रेस कोड लागू करणारे हे मुंबईतील पहिला सार्वजनिक गणपती असल्याची माहिती त्यांनी दिली.सध्याच्या इंटरनेटच्या युगात येथील मंडप परिसरात वाय फाय कनेक्शनची सुविधा देखील गणेश भक्तांना उपलबद्ध आहे.तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,खासदार गजानन कीर्तिकर,महापौर स्नेहल आंबेकर तसेच सर्वपक्षीय राजकीय नेते,प्रसिद्ध अभिनेता सलमान खान,नाना पाटेकर,प्रियांका चोपडा,प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीज-गायक अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत अशी माहिती कार्यकारी अध्यक्ष महेंद्र देढीया आणि सहखजिनदार सचिन नायक यांनी दिली.यंदा येथे कोणतीही घात पात होऊ नये म्हणून २५ सीसी टिव्ही कॅमेरा येथे बसवण्यात आले आहेत.तर समितीचे सुमारे २५० कार्यकर्ते अहोरात्र येथे जगता पहारा ठवणार असल्याची माहिती समितीचे सचिव विजय सावंत आणि राजेश फणसे यांनी दिली. १९७३ साली येथील आझाद नगर मध्ये राहात असलेले आणि गोल्डन टोबँको,एक्सल,टाटा स्टील आणि अन्य कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कारखाने बंद पडले होते.आमचे कारखाने लवकर सुरु होऊ देत म्हणून आम्ही संकष्टीला विसर्जन करू असा नवस अंधेरीच्या राजाला केला.आणि कारखाने परत सुरु झाले.त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीलाविसर्जन होते.या दिवशी सायंकाळी अंधेरीच्या राजाची संपूर्ण रात्रभर भव्य मिरवणूक निघते.आणि दुसऱ्या दिवशी दुपारी वेसावे येथील खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन होते अशी माहिती सुबोध चिटणीस आणि प्रकाश रासकर यांनी दिली.