शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

शिवसेनेला सुटी देण्याची हीच वेळ - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 11, 2017 05:19 IST

माझा विरोध शिवसेनेला नाही; मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्यपद्धतीला आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिले की, पराकोटीची बेपर्वाई येते.

यदु जोशी, मुंबईमाझा विरोध शिवसेनेला नाही; मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्यपद्धतीला आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिले की, पराकोटीची बेपर्वाई येते. आपण कसेही वागलो तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी वृत्ती येते. अशा लोकांना सुटी देण्याची वेळ कधी ना कधी येते. ती नेमकी वेळ आता आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्याचे संकेत दिले.मराठी माणसाच्या नावावर बरीच वर्षे भावनिक राजकारण खेळले गेले. आता ते मराठी माणसाला नीट कळले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही तुटूच शकत नाही, त्यामुळे भावनिक राजकारणाला यापढे थारा मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले....तर मंत्रिमंडळ बैठक खुली करण्याची तयारीपारदर्शकतेसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकार यांना बसू देण्याची घटनेमध्ये तरतूद असेल तर आपली पूर्ण तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हार्दिक पटेलला बोलावून अंगावर शाल टाकल्याने गुजराती मते फुटणार नाहीत; पण त्यांची मराठी मते विचलित झाली आहेत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.

प्रश्न : नेमक्या कोणत्या मुद्द्यावर मुंबईत युती तुटली? मुख्यमंत्री : पारदर्शकतेचा मुद्दा संयुक्त जाहीरनाम्यात टाकावा, अशी आमची भूमिका होती. ते आपल्याच महापालिकेच्या विरुद्ध जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीबाबत निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते. मी युतीसाठी पारदर्शकतेचा आग्रह धरला. त्यातूनच युती तुटली. प्रश्न : शंकराचार्य बसायचे त्या भाजपाच्या मंचावर आता गुंडाचार्य बसू लागलेत, या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचे काय?मुख्यमंत्री : आम्ही फार गुंड लोकांना घेतलेले नाही. पक्षाचा विस्तार झाला, पक्ष मोठा झाला की अनेक लोक येत असतात, पण आमच्यावर जे आरोप करतात त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे? प्रश्न : पंतप्रधान मोदींसोबत पप्पू कलानीचा फोटो असलेले पोस्टर व्हायरल झाले, त्याचे काय?मुख्यमंत्री : उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आमच्यासोबत आहेत. तुम्ही जे पोस्टर म्हणता ना ते आमच्याविरुद्ध सुडो वॉर छेडलेल्यांनी बनविलेले आहेत. त्यासाठी त्यांनी खास टीम तयार केल्या आहेत. स्वत:च पोस्टर करून ते व्हायरल करीत आहेत. प्रश्न : उद्धव ठाकरे यांनी पूर्ण प्रचारात आपल्याला टार्गेट केले आहे? मुख्यमंत्री : त्यांच्यावर टीका करीत सुटणे हा माझा अजेंडा नाही. माझा अजेंडा पारदर्शकतेचा आहे. त्या अनुषंगाने घोटाळ्यावर मी बोलणारच. दुर्दैवाने ठाकरे यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही. प्रश्न : आपण मुंबईची तुलना पाटण्याशी केली हे आपल्याला योग्य वाटते? मुख्यमंत्री : तक्रार निवारण हा पारदर्शकतेचा पाया आहे. त्याबाबत मुंबई महापालिका आणि पाटण्याला या अहवालात समान गुण दिलेले आहेत. तिरुअनंतपुरम, हैदराबादसह अनेक शहरे आपल्या पुढे आहेत. मी तुलना केलेली नाही. पाटण्याला मुंबईच्या बरोबरीने आणले याबद्दल तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे. प्रश्न : जिल्हा परिषदांत भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. आपण कोणते मुद्दे घेऊन जात आहात?मुख्यमंत्री : लोकांमध्ये सरकारबद्दल विश्वासाची भावना आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेले काम, जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महात्मा फुले जीवनदायी योजनेची वाढविलेली व्याप्ती, मागेल त्याला तळे, कृषी वीज पंपांचे दिलेले सर्वाधिक कनेक्शन, हजारो शाळा डिजिटल केल्या, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत १२०० आजार समाविष्ट करून लाभार्थ्यांची संख्या दीडपट करणे, या आमच्या उपलब्धी आहेत. लोकांना या सरकारबद्दल असलेला भरवसा मला प्रत्येक सभांमधून जाणवतो.