शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी वेतनप्रकरणी शिळ्या कढीलाच ऊत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 05:46 IST

एसटी महामंडळ वेतनवाढ प्रकरणी उच्चस्तरीय समितीने अन्य राज्यांतील महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. या वेळी अन्य राज्यांतील आर्थिक स्रोत, त्यांचे उत्पन्न आणि खर्च यांच्या ‘फायली’ मागवण्यात आल्या

मुंबई : एसटी महामंडळ वेतनवाढ प्रकरणी उच्चस्तरीय समितीने अन्य राज्यांतील महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. या वेळी अन्य राज्यांतील आर्थिक स्रोत, त्यांचे उत्पन्न आणि खर्च यांच्या ‘फायली’ मागवण्यात आल्या. तथापि, या दुसºया बैठकीतही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. परिणामी मंत्रालयात झालेली ही उच्चस्तरीय बैठक म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ असल्याची टीका कर्मचारी खासगीत करत आहेत.एसटी महामंडळ कर्मचाºयांच्या वेतनप्रश्नी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश दिले होते. या उच्चस्तरीय समितीची दुसरी बैठक सोमवारी पार पडली. समितीची पहिली बैठक २७ आॅक्टोबर रोजी झाली होती. महामंडळाने १५ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम वाढ देण्याचा निर्णय घ्यावा, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या दुसºया बैठकीकडे राज्यातील एक लाखाहून अधिक कर्मचाºयांचे लक्ष लागून होते. सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती.तथापि, या बैठकीत अंतरिम वाढीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रश्न जैसे थेच राहिला आहे. बैठकीत अन्य राज्यांतील महामंडळाबाबत माहिती सादर करण्यात आली. यात महामंडळाचे आर्थिक स्रोत, सद्य:स्थिती, कर्मचाºयांचे मूळ वेतन (ग्रेड पे) यांची माहिती सादर करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच एसटीतील सद्य आर्थिक स्थिती,सुरू असलेल्या विविध योजनांसाठी येणारा खर्च याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. मात्र कर्मचाºयांच्या पगाराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.विशेष म्हणजे, वेतन सुधार समितीने या सर्व बाबींची तपासणी करून कर्मचाºयांच्या बाजूने आधीच निर्णय दिलेला आहे. त्यामुळे कर्मचाºयांना दिलासा मिळाला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप करण्ययात आलेली नाही. आता बैठकीत पुन्हा एकदा नव्याने याच बाबी तपासण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार बैठका होत असल्या तरी त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.१७ ते २० आॅक्टोबर रोजी राज्यात एसटी कर्मचाºयांनी संप पुकारला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार २४ आॅक्टोबर रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत राज्याचे अर्थ सचिव, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ वित्तीय अधिकाºयांचा समावेश आहे. ही समिती २२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण वेतनवाढीचा निर्णय घेऊन न्यायालयासमोर अहवाल सादर करणार आहे.वेतनकरार पूर्ण होऊन १९ महिने उलटले आहेत. तुटपुंज्या वेतनासंबंधी कामगारांनी संप पुकारला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार संप मागे घेण्यात आला. सध्या एसटी कर्मचारी वेतनवाढ प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही. परिणामी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे महाराष्टÑ एसटी कामगार संघटनेचे सचिव हनुमंत ताटे यांनी सांगितले.

टॅग्स :ST Strikeएसटी संप