ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - पुण्यातील टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव उमेश केसकर यांना विनयभंग प्रकरणी पुणे येथे आज अटक केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील एक महिला रेक्टरने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी केसकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पुणे पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली आहे.