शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
2
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
3
"मी काय मूर्ख नाही, भाजपचं मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
4
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
5
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा
6
निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?
7
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका
8
प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न
9
डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले
10
UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर
11
तेरी गली में आया भूल के...! Ananya Pandey चा KKR च्या शिलेदारांसोबत डान्स, VIDEO
12
"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले
13
“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत
14
Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड
15
प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली
16
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
17
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
18
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं
20
'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

वाघ, बिबटे आणि लोकांचा संघर्ष वाढतच जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 5:50 AM

मानवी वस्त्या विस्तारल्या, विकास प्राण्यांच्या जीवावर

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : गेल्या सहा वर्षांत राज्यात ९३ वाघ आणि तब्बल ४४३ बिबट्यांचे मृत्यू झाले. त्यातील ५६ वाघ आणि २५१ बिबट्यांना नैसर्गिक मृत्यू आला. पण ३७ वाघ आणि १९२ बिबटे मात्र अपघातात किंवा शिकारीत मरण पावले. मानवी वस्त्या विस्तारल्या, विकासाचे मॉडेल प्राण्यांच्या जीवावर बेतू लागले, तसे ते माणसांचाही बळी घेत आहे. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अटळ आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे पाच बिछडे होरपळून मेले, तर शनिवारी पाडव्याच्या दिवशी चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी जवळ वाघाने दोन माणसांचा जीव घेतला. यावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, वाघ किंवा बिबट्या यांचे नैसर्गिक भक्ष्य दोन पायांचा प्राणी माणूस हा कधीच नाही. माणसांना टाळणे हा वाघांचा मूळ गुणधर्म आहे.

पण मानवी वस्त्या विस्तारल्या, त्यातून कचरा वाढला, कचऱ्याच्या जागी डुकरं, कुत्री आणि कोंबड्या आल्या. बिबट्यांना सहज टप्प्यात हे खाद्य मिळू लागले त्यामुळे ते मानवी वस्तीत येऊ लागले. त्यातून माणूस आणि बिबट्यांचा संघर्ष वाढत चालला आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्र हे ३,०७,७१३ चौरस किलोमीटर आहे, त्यापैकी ६१,५७९ चौ. कि.मी. वनक्षेत्र आहे, तर ५०,६८२ चौ. कि.मी. जागेवर वृक्षाच्छादन आहे. तसेच ९५०० चौ. किलोमिटर एवढे अभयारण्य आणि राष्टÑीय उद्यान आहे. जंगलाची साखळी टिकल्यामुळे वाघांची, बिबट्यांची संख्या वाढली. पण जैविक दबावातून, आवळा, तेंदूपत्ता, मोहाची फुलं, करवंद, सरपण अशा असंख्य गोष्टीसाठी आजही लोक जंगलावर अवलंबून आहेत. तेंदूपत्ता किंवा मोहाची फुले काढण्यासाठी खाली वाकून काम करावे लागते. त्यामुळे वाघ किंवा बिबट्याला ती आपली शिकार वाटते. त्यातच आपल्याकडे जंगलाचे लहान मोठे एक हजाराच्या आसपास तुकडे आहेत. एकट्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या चारही बाजूने पूर्वी नव्हती एवढी घरे उभी राहिली आहेत. वाघांचा अधिवास आधीपासून तेथेच होता, पण माणूस तेथे वस्तीला आला. वाघाला त्याच्या सीमेची माहिती कशी असणार? त्यातून संघर्षाच्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

वन विभाग यावर काय करत आहे असे विचारले असता नितीन काकोडकर म्हणाले की, गेल्या १० ते १५ वर्र्षात आमचा प्रतिसाद वाढला, आमच्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध झाले आहे. मात्र प्राण्यांना पकडण्यापेक्षा तेथे जमलेल्या बघ्यांना नियंत्रणात आणणे अधिकाऱ्यांसाठी जास्त त्रासदायक असते. कुतूहल लोकांना गप्प बसू देत नाही.ते आम्हाला त्रासदायक ठरते.वर्ष      वाघ   बिबटे२०१३   १५   ४३२०१४   ६    ६५२०१५   १३   ६६२०१६  १४   ९१२०१७  २२  ८५२०१८  १९  ८८२०१९    ४      ५(एकूण) ९३   ४४३ऊ साची शेती बिबट्यांना पोषकऊ साच्या शेतीसारखी पोषक व सुरक्षीत जागा बिबट्यांना दुसरी नाही. कारण एकदा पाणी सोडले की रोज ऊ साच्या शेतीकडे बघायची गरज नसते. शेतात व आजूबाजूला डुकरे, कोंबड्या, कुत्री असतात. त्यामुळे खाद्य, पाणी आणि संरक्षण गोष्टी त्यांना तेथे मिळू लागल्या. त्यामुळे ऊ साच्या शेतात बिबट्यांचे प्रजनन वाढले आहे. त्यातूनच पुण्याची दुर्देवी घटना घडली.लोकांनी आग न लावता वनअधिकाऱ्यांना कळवले असते तर ते बछडे वाचले असते, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले. 

टॅग्स :leopardबिबट्या