विरार/पारोळ : तासभर आॅक्सीजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो व आयुष्यभर आॅक्सीजन देणाऱ्या झाडांची आपण कत्तल करतो. झाडे लावा जीवन वाचवा व झाडाला आपला मुलगा समजून त्यांचे संगोपन करा, पूर्वी विवाहितेला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव: असा आशिर्वाद द्यायचे आता अपत्य एकच पण वृक्ष मात्र दहा लावून जगवा हे तत्व अमलात आणायची गरज आहे. असा सामाजिक संदेश महाराष्ट्र राज्य वन प्रकल्प विभाग ठाण्याच्या अंतर्गत शिरसाड येथील विक्री आगारात पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डी. एन निकम सहाय्यक व्यवस्थापक, एम डी कतोरे वनपरिक्षेत्र अधिकारी, व एस ए. मुसमाडे या अधिकाऱ्यांसह मांडवी वनकार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन वृक्षरोपण केले. (वार्ताहर)
‘दश वृक्ष, एक पुत्र’ नवा मंत्र
By admin | Updated: June 8, 2016 02:46 IST