शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे

By admin | Updated: November 19, 2014 23:26 IST

रत्नागिरी विभाग : नऊ कोटींची तिकिटे शिल्लक

मेहरून नाकाडे - रत्नागिरी -राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गेल्या तीन ते चार वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनद्वारे (इटीआयएम) प्रवाशांना तिकिटेदेण्यात येत आहेत; परंतु रत्नागिरी विभागात नऊ कोटी १६ लाख ९४ हजार ६५१ रुपयांचा तिकीटसाठा शिल्लक राहिल्याने तो संपविण्यासाठी वाहकांच्या गळ्यात पुन्हा एकदा तिकिटांचा ट्रे आला आहे. महिनाभरात पाच कोटी ४५ लाख ४०० रुपयांची तिकिटे संपविण्यात आली.राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही आता कात टाकण्यास प्रारंभ केला आहे. तिकीट आरक्षण संगणकीकृत केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनद्वारे शहरी व लांब फेऱ्यांच्या एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांचे वितरण करण्यात येत होते.  या मशीनवरून तिकीट देणे वाहकांना सोपे होत असे. शिवाय इलेक्ट्रॉनिक्स मशीनमुळे प्रत्येक फेरीचा हिशेब लिहिण्याची कटकट संपली होती. मात्र, आता जुनी तिकिटे मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने एस.टी. पुन्हा चार वर्षे मागे गेली आहे. वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे देण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला.तिकीट ट्रेचा वापर सुरू झाला असून, त्यामुळे तिकिटे किती संपली, किती रुपयांची संपली, याचा सर्व हिशेब लिहून ठेवावा लागत आहे. मशीनचा वापर सुरू झाल्यानंतर हिशेबाची कटकट संपल्याने वाहकांनी समाधान व्यक्त केले होते, परंतु या मशीनचा वापर करण्यापूर्वी छपाई केलेला तिकीटसाठा संपविण्याचे आदेश प्रशासनाने प्रत्येक विभागाला दिले असून, सध्या वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स मशीन वापरण्यास प्रशासनाने बंदी केली आहे.रत्नागिरी विभागातील नऊ कोटी १६ लाख ९४ हजार ६५१ रुपयांचा तिकीटसाठा शिल्लक राहिला होता. शिल्लक राहिलेला तिकिटांचा साठा खराब होऊ नये, शिवाय महामंडळाचा खर्च वाया जाऊ नये यासाठी पुन्हा एकदा तिकिटांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पाच कोटींचा साठा संपलाकेवळ दहा दिवसांसाठी लागणारा तिकीटसाठा शिल्लक ठेवून उर्वरित सर्व तिकिटे संपविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार वाहक सध्या तिकीट ट्रेमधील तिकिटे पंचिंग करून देत आहेत. सर्व आगारांतून आतापर्यंत पाच कोटी ४५ लाख ४०० रुपयांचा तिकीटसाठा संपविण्यात आला आहे.