शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

देव-दानव युद्धाचा थरार

By admin | Updated: December 13, 2015 23:51 IST

असाच प्रत्यय श्री क्षेत्र कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविक-भक्तांनी अनुभवला.

शेलपिंपळगाव :ऐशी भानोबाची ख्याती !प्रतिवर्षी येती उत्सवासी !!भक्तिभावे पूजता त्यासी !दु:ख दैन्य निवारी !!असाच प्रत्यय श्री क्षेत्र कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविक-भक्तांनी अनुभवला. श्री भानोबाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दर वर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय आयोजित उत्सवामध्ये पहिल्या व दुसऱ्या दिवशी खेळले जात असलेले देव आणि दानवांचे युद्ध अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक-भक्तांनी येथे हजेरी लावली होती.कोयाळीत श्री भानोबा देवाच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले. या वेळी देवाच्या स्वागत समारंभाला नागरिकांची संख्या मोठी लक्षणीय होती. कोयाळी येथे शनिवारी आणि रविवारी देव-दानावांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी, तसेच श्री भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसांत हजारो भाविकांनी हजेरी लावली. तत्पूर्वी, आज पहाटे श्री भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला.सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत देव-दानव युद्ध झाले. देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबारीतून सुरुवात झाली. उत्सवात कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. या वेळी जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजन कार्यक्रमाची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती. सोमवारी (दि. १४) सकाळी ६ ते ७ श्री भानोबा देवाचा ओलांडा, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ७ श्री भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल, तसेच कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. भानोबाच्या तीन दिवसीय उत्सवात खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिलीप मोहिते, उद्योजक राजेंद्र गायकवाड आदींसह विविध राजकीय पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. तीन दिवसीय चाललेला हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी- भानोबाच्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, सरपंच वृंदाताई गायकवाड आदींसह सर्व ग्रामस्थ व देवस्थानचे मोठे योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)