शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे तरुण इसिसच्या जाळ्यात

By admin | Updated: August 15, 2016 03:59 IST

इसिसचे दहशतवादी बनावट फेसबुक खाते उघडून मुलींच्या नावाने मॅसेज पाठवतात.

वसई : इसिसचे दहशतवादी बनावट फेसबुक खाते उघडून मुलींच्या नावाने मॅसेज पाठवतात. या मॅसेजला लाईक करणाऱ्या तरुणांना आमिष दाखवून त्यांचे ब्रेन वॉश करून दहशतवादी संघटना आपल्या जाळ्यात ओढते. त्यांना मोबाईल नंबर दिल्यास फार मोठे संकट येऊ शकते. म्हणून सोशल मिडीयावर अशा साईटपासून दूर रहा, असे आवाहन दिल्ली येथील जामा मस्जिदचे सल्लागार व इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे प्रवक्ते डॉ. अब्दुल अंजारीया यांनी नालासोपारा येथे बोलताना केले.वसई विरार परिसरातील तरुणांना इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांपासून सावध करण्यासाठी पोलिसांनी नालासोपारा येथे दहशतवाद व राष्ट्रीय एकात्मता र्काशाळेचे आयोजन केले होते. यावेळी अंजारीया यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. इस्लाम धर्मीयांना भडकवायचे, त्यांना दहशतवादी बनवायचे आणि भारताविरोधात कट कारस्थान करण्यासाठी भाग पाडायचे ही दहशतवाद्यांची कार्यपद्धती आहे. दहशतवादामुळे मुस्लीम समाज बदनाम होत आहे.संपूर्ण जगात हिंदुस्थाननेच प्रथम दहशतवादाला विरोध केला आहे, असे अंजारीया यांनी यावेळी बोलताना सांगितले. भारत ७० वर्षांपासून काश्मिरचा सांभाळ करीत आहे. काश्मिर पाकीस्तानला द्यायचा की नाही याबाबत भारतीय जनतेला विचारा, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)>आई-वडिलांनो, लक्ष द्या!प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांचे मोबाईल, लॅपटॉप, कप्युटर तपासणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांवर जातीने लक्ष ठेवले पाहिजे. रात्री-अपरात्री मुले कुठे जातात, कुणाबरोबर फिरतात. कुणाला भेटतात यावरही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी सांगितले.