शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगीक अत्याचार

By admin | Updated: February 21, 2017 20:34 IST

महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच चिखलीतही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणाऱ्या ३ वर्षीय चिमुरडीवर शाळेत

ऑनलाइन लोकमतचिखली (बुलडाणा), दि. 21 : महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच चिखलीतही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणाऱ्या ३ वर्षीय चिमुरडीवर शाळेत मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या १९ वर्षीय  पवन शेवत्रे या नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घडना २१ फेबु्रवारी रोजी उघडकीस आली. दरम्यान आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणाऱ्या एका ३ वर्षिय चिमुरडीच्या पोटात दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे १५ फेब्रुवारी रोजी शाळेतून परत आल्यानंतर केली होती. त्यामुळे तीच्या आईने तीला पोटदुखीवरचे औषध दिले होते. दरम्यान १६ तारखेला सुटी असल्याने ती घरीच होती. मात्र, १७ तारखेला पुन्हा शाळेतून आल्यानंतर तिचे पोट दुखत असल्याचे तीने तीच्या आईला सांगीतले. त्यावरून या चिमुरडीच्या आईने शाळेत शिक्षीकेला विचारणा केली.

मात्र शाळेत खेळत असताना लागले असेल म्हणून याबाबीकडे दूर्लक्ष झाले होते. तर १८ व १९ फेब्रुवारी रोजी तीला बरे वाटत नसल्याने ती शाळेत गेली नाही. मात्र, २० फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेत ही चिमुरडी आपल्या आईसोबत गेली असता तेथे पवन शेवत्रे याला पाहून किंचाळली व रडू लागली व नराधामास पाहून भेदरलेली ही चिमुरडी शाळेत जाण्यास नकार देवू लागली. दरम्यान, या प्रकारावरून एक सुजान महिला नातेवाईकेने समयसुचकतेने व चिमुरडीला विश्वासात घेवून विचारपूस केल्याने शाळेतील हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी नराधम पवन  शेवत्रे याच्याविरूध्द बाललैंगीक अत्याचार कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणान्यायालयाने त्यास २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.