शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमियाग्रस्त तीन वर्षांच्या बालिकेला नवजीवन

By admin | Updated: June 26, 2017 02:39 IST

मुंबईत जन्मलेली किनाया शाह ही तीन महिन्यांची असतानाच तिला थॅलेसेमियाचे निदान झाले होते. सातत्याने रक्त देत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत जन्मलेली किनाया शाह ही तीन महिन्यांची असतानाच तिला थॅलेसेमियाचे निदान झाले होते. सातत्याने रक्त देत उपचार केल्यानंतर तिच्या पालकांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात तीन वर्षांच्या किनायाला थॅलेसेमियातून बरे करण्यासाठी एरवी ‘ल्युकेमिया’साठी (रक्ताचा कर्करोग) वापरण्यात येणारी ‘हिप्लोस्टेक्टीकल बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तिच्या वडिलांच्या ‘स्टेम सेल’चा उपयोग यात करण्यात आला असून किनायाला आता सतत रक्त देण्याची तसेच दीर्घकाळ औषधे घेण्याची गरज उरलेली नाही. पश्चिम भारतात प्रथमच अशी उपचारपद्धती वापरण्यात आली आहे.किनायाला थॅलेसेमियाचे निदान झाल्यावर इतकी वर्षे तिला वेल्लोर, बेंगळुरू आणि पुणे येथे सातत्याने रक्तपुरवठ्याचे उपचार केल्यानंतर तिच्या पालकांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील डॉ. सांतनू सेन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी किनायाला बरे करण्यासाठी नवीन उपचारपद्धती वापरण्याचा निर्णय घेतला. सेन यांनी तीन महिने केमोथेरपी देत किनायाची रोगप्रतिकारकशक्ती वाढवली. त्यामुळे तिच्या शरीराला ग्राफ्ट (प्रत्यारोपण) स्वीकारण्यासाठी मदत झाली. एकसारख्या पेशी असलेला दाता शोधण्यासाठी ‘एचएलए टायपिंग’ अतिशय महत्त्वाचे असते, कारण ते जनुकीय पातळीवर निश्चित झालेले असतात. अशावेळी रुग्णाशी संबंधित व्यक्तींच्या पेशी जास्तीत जास्त मिळत्याजुळत्या असतात. तीन महिने केमोथेरपी दिल्यानंतर वडिलांच्या बोन मॅरोमधून ‘स्टेम सेल’ घेतले. मात्र त्यांचे स्टेम सेल ७० टक्के जुळत असल्याचे जनुकीय चाचणीत दिसून आले. शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा पेशींच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या ‘एचएलए प्रोटिन्स’च्या मदतीने शरीरातील मूळ पेशी तसेच बाहेरून आलेल्या पेशी ओळखते. जनुकीय चाचणीमध्ये तिच्या वडिलांचे स्टेम सेल्स ७० टक्के समान असल्याचे दिसल्याने ट्रान्सप्लान्टसाठी तेच वापरायचे डॉक्टरांनी ठरवले. तिच्या शरीराने हे ग्राफ्ट स्वीकारले नाही, तर जोखीम नको म्हणून किनायाचे स्वत:चे स्टेम सेल्सही आधीच गोठवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर किनायावर शस्त्रक्रिया झाली.रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढली-थॅलेसेमिया आजाराचे रुग्ण बरे करण्यासाठी ‘हिप्लोस्टेक्टीकल बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ प्रक्रिया वापरण्यास सुरुवात केली आहे. एरवी ही प्रक्रिया ‘ल्युकेमिया’ हा आजार बरा करण्यासाठी वापरली जाते. नव्या उपचार पद्धतीमुळे लहान मुलांसाठी बरे होण्याची शक्यता अधिक वाढली असल्याचे डॉ. सेन यांनी सांगितले.