शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

राज्यात पीएसआयच्या तीन हजार जागा रिक्त, एमपीएससीकडे २१६ जागांचे मागणीपत्र

By दीपक भातुसे | Updated: December 30, 2024 06:22 IST

याशिवाय एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील १ हजार जागाही रिक्त आहेत.

दीपक भातुसे

मुंबई : राज्यात पोलिस उपनिरीक्षकांच्या  (पीएसआय) जवळपास ३ हजार जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात, अशी मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने एमपीएसीकडे केवळ २१६ पीएसआयच्या जागा भरण्याचे मागणीपत्र पाठवले आहे. याशिवाय एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील १ हजार जागाही रिक्त आहेत.

राज्यात पीएसआयची ९८४५ पदे मंजूर होती. यातील ६८४५ पदे भरण्यात आली असून २९५९ पदे रिक्त आहेत. पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे. एमपीएससीकडून राज्यसेवा व लेखी पॅटर्न २०२५ पासून लागू केला जाणार आहे. यंदा झालेली पूर्व व होणारी मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातील शेवटची परीक्षा असणार आहे.

इतर विभागांतील रिक्त पदेउपजिल्हाधिकारी    १६ पोलिस उपअधीक्षक     १६१ तहसीलदार    ६६ नायब तहसीलदार     २८१ मुख्याधिकारी (अ)     ४४ मुख्याधिकारी (ब)     ७५ उपशिक्षणाधिकारी     ३४७

पीएसआयच्या रिक्त जागांसह राज्य शासनाच्या विविध विभागांतील एक हजारपेक्षा जास्त रिक्त जागांचा समावेश जाहिरातीत करावा, अशी मागणी एमपीएससीच्या जुन्या पॅटर्नचा अभ्यास केलेले राज्यातील लाखो विद्यार्थी करत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही १ डिसेंबर रोजी पार पडली आहे. मुख्य परीक्षा होण्याआधी सरकारने रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे जेणेकरून नव्या पॅटर्ननुसार परीक्षा होण्यापूर्वी जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास करून परीक्षा दिलेल्या बेरोजगार युवकांना न्याय मिळेल. - महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

टॅग्स :PoliceपोलिसState Governmentराज्य सरकार