शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जहाजाच्या स्वच्छतेवेळी तीन खलाशांचा मृत्यू

By admin | Updated: February 12, 2017 02:07 IST

भरसमुद्रात धान्यवाहू बार्जच्या सफाईसाठी उतरलेल्या एका खलाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या बचावासाठी अन्य खलाशी खाली उतरले. मात्र त्याच दरम्यान आतील विषारी

मुंबई : भरसमुद्रात धान्यवाहू बार्जच्या सफाईसाठी उतरलेल्या एका खलाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या बचावासाठी अन्य खलाशी खाली उतरले. मात्र त्याच दरम्यान आतील विषारी वायूच्या संपर्कात आल्याने त्यापैकी तिघांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शुुक्रवारी घडली. तिघा जखमींवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात साडेचार नाविक मैल अंतरावर एमव्ही ओरियन - २ या धान्यवाहू बार्जमध्ये धान्य भरण्यात येत होते. अचानक सांडपाण्याची टाकी जास्त भरल्याने जहाज एका दिशेला कलले. पातळी कमी करण्यासाठी तात्काळ एक खलाशी आत उतरला. मात्र आत उतरताक्षणी त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो तिथेच कोसळला. त्याला वाचविण्यासह आतील सफाईसाठी बार्जच्या मास्टरसह इतर खलाशी उतरले, त्यांनाही आतील विषारी वायूने अस्वस्थ वाटू लागले. बार्जच्या पोकळीमध्ये साचलेले पाणी आणि धान्य यामुळे तयार झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने त्यांना हा त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड बोट क्रमांक सी. १५४ तेथे दाखल झाली. त्यांनी सर्वांना बोटीतून इंदिरा डॉक येथे आणण्यात आले. तेथून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. मंगेश भोसले (२७), जयंता चौधरी (२३) आणि क्रितीक कोच (२३) अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- मास्टर एमडी दौड इब्राहीम कुरी (५०) यांच्यासह शर्मासन मंडल आणि गणेश बाहिया यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.