शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

कोर्टाच्या आदेशानंतरही तीन ‘कोठडी मृत्यू’

By admin | Updated: December 9, 2015 01:16 IST

राज्यात एकही कोठडी मृत्यू होता कामा नये, असे उच्च न्यायालयाने बजावूनही दोनच महिन्यांत राज्यात तीन कोठडी मृत्यू झाले.

मुंबई : राज्यात एकही कोठडी मृत्यू होता कामा नये, असे उच्च न्यायालयाने बजावूनही दोनच महिन्यांत राज्यात तीन कोठडी मृत्यू झाले. उच्च न्यायालयाने या तिन्ही कोठडी मृत्यूंबाबत तपशिलावार माहिती देण्याचे निर्देश सरकारला दिले, तसेच कबुलीजबाब वदवून घेण्यापेक्षा तपासावर भर द्या, असा टोलाही पोलिसांना लगावला, तसेच अशा घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा असे प्रकार थांबणार नाही, असे अशा शब्दांमध्ये न्यायालयाने सरकारला आदेश दिले.२१ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने राज्यात पुढील सहा महिने एकही कोठडी मृत्यू होता कामा नये, असे राज्य सरकारला बजावले होते. तरीही गेल्या दोन महिन्यांत राज्यात तीन कोठडी मृत्यू झाल्याची बाब न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. आॅक्टोबरमध्ये दोन तर २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यामध्ये एकाचा कोठडी मृत्यू झाल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने या तिघांवर कोणता गुन्हा नोंदवण्यात आला? त् शवविच्छेदन अहवालात काय नमूद करण्यात आले आहे, याची तपशिलवार माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. काही महिन्यांपूर्वी वडाळा रेल्वे स्टेशन पोलिसांच्या कोठडीत एका तरुणाचा मृत्यू झाला. याविरोधात त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेची व्याप्ती वाढवत संपूर्ण राज्यासाठी ती लागू केली आहे. (प्रतिनिधी)