ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 14 - ट्रॅक्टरमधील सिमेंट आणि लोखंडी पोल अंगावर पडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पारवा येथे ही दुर्घटना घडली.
प्रशांत चौधरी, हनुमान येडमे ,पांडुरंग येडमे अशी तीन मृतांची नावे आहेत. जखमी अजय वैद्य वर घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.