शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी झाडावर आदळून तीन ठार

By admin | Updated: September 2, 2016 02:27 IST

बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघात; सहा गंभीर.

चिखली (जि. बुलडाणा) : भरधाव वेगातील काळी पिवळी टॅक्सी रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन ठार तर आठ जण जखमी झाले. ही घटना चिखली-मेहकर मार्गावरील मुंगसरी फाट्यावर १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेहकर येथून चिखलीकडे निघालेल्या काळीपिवळी टॅक्सीने (एम.एच २८ एच २२0५) विरुद्ध दिशेने मेहकरकडे जाणार्‍या एम.एच. ४0 एन.९५८१ क्रमांकाच्या एसटी बसला बाजू देत असताना टॅक्सीचालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅक्सी रस्त्याच्या कडेला असलेल्या कडूनिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात टॅक्सीतील प्रवासी शिवाजी उत्तमराव देशमुख ( ५५ रा.सवडत ता.सिंदखेडराजा) व फिरोजखान जब्बार खान (२८ रा. मेहकर) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर हिवरा आङ्म्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी गणेश माधव काकडे (२0) रा.कव्हळा ता.चिखली याला गंभीर जखमी अवस्थेत दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. टॅक्सीतील अन्य प्रवासी शिवाजी लिंबाजी पवार (३0) रा.लव्हाळा, सोहम रामेश्‍वर पाटील (२0) रा.आन्वी, विजय उत्तम राजगुरू (४७) रा.देऊळगावमाळी, रशीदाबी अब्दुल रहीम ( ४५) रा.मेहकर, सदामशहा दाऊतशहा (२५) रा.जानेफळवेस मेहकर, सगीराबी अब्दुल गफ्फार (५६ ) रा.मेहकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातातील किरकोळ जखमी विकास प्रभाकर पवार (२0)रा.लव्हाळा, सकिराबी शेख फारूख (२९) रा.मेहकर यांच्यावर प्राथमिक उपचाराअंती रूग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान याप्रकरणी बसचालक प्रदीप रामकृष्ण जाधव रा. बुलडाणा यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी काळी पिवळी टॅक्सी चालक अब्दुल हमीद अब्दुल कदीर रा.मेहकर याच्याविरूध्द भरधाव वेगात व निष्काळजीपणाने वाहन चालवून प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ (अ) भादविनुसार गुन्हा दाखल केला.