शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बस कंटेनरवर धडकून तीन ठार, १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:26 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. जखमींमध्ये ८ जण गंभीर झाले असून, ७ जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला.या अपघाताची फिर्याद कारचालक रोहन रवींद्र लोकेगावकर (२६, रा. प्रभादेवी, मुंबई) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. रोहन लोकेगावकर हे कारने (एम एच ०१ बीटी ०१६२) कणकवलीहून मुंबई येथे जात होते. त्यांची गाडी इंदापूर येथे आली असता,गाडीमागून येणाºया चिराग ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र . एम.एच ०४ जीपी १६२७) कारला ओव्हरटेक केले व बसचालकाने मुंबईकडून येणाºया कंटेनरला (क्र . एम एच ४६ एच ५५३०) ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस व कंटेनरच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन, कंटेनरचालक रामकिशन जायभाये (३८, रा. दिवळनेर, ता. शिरूर), बाळकृष्ण दापले (४५, रा. मालाड मुंबई) हे दोन जण जागीच ठार झाले, तर बसचा चालक राजकुमार यादव (४५) याचा मुंबईला उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात लियाकत कासम रमदूल (४५), रजिया लियाकत रमदूल (४०), योगेश कृष्णा महाडिक (३२), सुनील कृष्णा नटे (४१), राहुल प्रकाश चौगुले (२४), वृषाली राहुल चौगुले (२४), प्राजक्ता प्रदीप गलांडे (३७), विनोद चेताराम राहू (१८) हे आठ जण गंभीर जखमी असून, इतर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रु ग्णालय व इंदापूर येथील रु ग्णालयात प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, माणगाव पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमींना रु ग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करून, बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम करीत आहेत.माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ज्ञानदेव कदम (३६, रा. महाड) जीप घेऊन मौजे लाखपाले गावाच्या हद्दीत आले असता, रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने जीप उलटून अपघात झाला. या अपघातात फिर्यादी ज्ञानेश्वर कदम, काशीराम कदम (६५), जितेंद्र कदम (३४), श्रुती कदम (३२), पूनम कदम (३२) सर्व रा. मुलुंड, मुंबई हे जखमी झाले असून, त्यांच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार भिलारे हे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात