मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह बांधकामासाठी जमीन खरेदी करताना घोटाळा केल्याप्रकरणी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.विभागाच्या पुणे कार्यालयातील तत्कालीन उपायुक्त अनिल कांबळे, सहायक आयुक्त मनीषा फुले आणि समाजकल्याण निरीक्षक संजय पवार अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा येथे वसतिगृह उभारण्याकरिता खासगी जमिनीची खरेदी करण्यात आली होती. जमीन मालकाला वाजवीपेक्षा अधिक लाभ पोहोचविताना अधिकाऱ्यांनाही त्याचा लाभ झाल्याचे चौकशीमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. या व्यवहाराचा चौकशी अहवाल पुण्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांनी विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उकेंकडे सादर केला होता. उके यांनी निलंबिताचे आदेश दिले.
जमीन खरेदी घोटाळ्यात तीन अधिकारी निलंबित
By admin | Updated: September 19, 2015 03:00 IST