मुंबई : अंडरवर्ल्डचा डॉन छोटा राजन याच्याशी संबंधित मुंबईतील विविध तीन पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या तीन जुन्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. एक गुन्हा खुनाचा असून, दोन गुन्हे हे गँगवार व मोक्कांतर्गत खंडणीसंबंधी आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार हे तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. वर्षभरापूर्वी छोटा राजन याचे इंडोनेशियातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले असून, तो सीबीआयच्या ताब्यात आहे. त्याच्याविरोधात देशात विविध ठिकाणी दाखल असलेल्या सर्व प्रलंबित गुन्ह्यांचा तपासही सीबीआय करीत आहे. मुंबईतील आणखी तीन प्रकरणे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. (प्रतिनिधी)
छोटा राजनविरुद्धचे तीन गुन्हे सीबीआयकडे वर्ग
By admin | Updated: January 24, 2017 04:38 IST