शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
3
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
4
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
5
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
7
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
8
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
9
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
10
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
11
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
12
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
13
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
14
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
15
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
16
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
17
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
18
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
19
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
20
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी तिघांवर गुन्हा

By admin | Updated: November 2, 2016 02:30 IST

लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

पनवेल : गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाजीम अब्दुल जब्बार शहाबाजकर यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरेंद्र मनसुखलाल खंदार (६५), भारती सुरेंद्र खंदार (५८), प्रफुल्ल मनसुखलाल खंदार (७०) अशी तिघा आरोपींची नावे असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुरेंद्र खंदारची जामिनासंदर्भात सुनावणी बाकी आहे.तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वात मोठा फसवणुकीचा गुन्हा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोपींनी १९८५ मध्ये सुमन मोटल व १९९४ तेज गौरव फार्म नामक कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याद्वारे नागरिकांना सेकंड होम हॉलिडेज स्कीमच्या नावाखाली गुंतवणूक करायला सांगितली होती. यात शेकडो नागरिकांनी गुंतवणूक केली होती. सुटीच्या दिवशी करमणुकीकरिता कर्नाळा आपटा फाटा येथे नागरिक येत असत. मात्र कंपनी बुडत असल्याचे समजताच नागरिकांनी खंदार यांच्याकडे दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. पैशांच्या बदल्यात आपटा फाटा येथील जमीन तुमच्या नावे करून देतो, असे सांगून काही नागरिकांना त्यांनी जमिनीचा ताबा देऊन रजिस्ट्रेशन करून दिले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की, गुंतवणुकीसंदर्भात मुंबई येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल झाला असून सदरची जागा या आधीच गुन्हे शाखेकडे जमा आहे. कुलाबा, मुंबई येथे राहणारे नाजीम शहाबाजकर यांनी १९९५-९६ च्या दरम्यान सुमन मोटलच्या स्कीममध्ये लाखोंची गुंतवणूक केली होती. आरोपींनी मौजे कर्नाळा येथे सर्व्हे नंबर २६४ व नवीन सर्व्हे ६२ हिस्सा नंबर १ बी प्लॉट नंबर १२ येथील भारती खंदार यांच्या नावे असलेली जमीन स्टॅम्प पेपरवर विक्री व विकासाचे अधिकार लिहून घेऊन नाजीम शहाबाजकर यांना फोर्ट मुंबई येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रार करून दिली. त्यानंतर जमीन शहाबाजकर यांना परत न देता भारती खंदार यांनी मुलगा तेजसला बक्षीस म्हणून दिली व शहाबाजकर यांची लाखो रु पयांची फसवणूक केली.