शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीचे तीन नवीन मार्ग

By admin | Updated: March 1, 2017 02:45 IST

प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन उपक्रमाने एनएमएमटीचे तीन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : विविध प्रवासी संघटना आणि प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन उपक्रमाने एनएमएमटीचे तीन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ मार्चपासून हे नवीन मार्ग कार्यान्वित होणार आहेत. हे तिन्ही मार्ग सर्वसाधारण बसेसचे असणार आहेत. यातील एक मार्ग नेरूळ बसस्थानक ते मुलुंड मार्गे घाटकोपरपर्यंतचा आहे. तर उर्वरित दोन मार्ग नवी मुंबई शहरांतर्गत वसाहतींना जोडणारे आहेत.मागील दोन-अडीच वर्षांत एनएमएमटीच्या कारभारात आमूलाग्र बदल घडले आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: एनएमएमटीच्या वातानुकूलीत बसेसना अधिक पसंती मिळताना दिसत आहे. असे असले तरी आणखी काही मार्गांवर बसेस सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर परिवहन व्यवस्थापनाने बुधवारपासून तीन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मार्ग क्रमांक ५ ही बस कोपरखैरणे रेल्वे स्थानक ते वाशी स्थानकादरम्यान धावणार आहे. ही बस कोपरखैरणे सेक्टर ११ मार्गे पाम सोसायटी, कलश उद्यान, बोनकोडे गाव, कोपरी नाका येथून वाशी बस डेपोतून वाशी स्थानकाकडे जाणार आहे. तर मार्ग क्रमांक २८ ही बस घणसोली आगार ते नेरूळ बस स्थानक या दरम्यान असणार आहे. या मार्गाची बस घणसोली घरोंदा, कोपरखरेणे बस डेपो, कोपरी नाका, एपीएमसी, सानपाडा रेल्वे स्थानक, जुईनगर रेल्वे स्थानक, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ते नेरूळ बस स्थानक यादरम्यान असणार आहे. तिसरा मार्ग क्रमांक १११ ही बस नेरूळ बस स्थानक, महाराणा प्रताप चौक, मुलुंड मार्गे घाटकोपर असा आहे. ३४.३ कि.मी. लांबीचा हा मार्ग नवी मुंबई व मुंबईतील अनेक उपनगरांना जोडला जाणार आहे. >मार्ग क्रमांक ५ कोपरखैरणे स्थानकातून पहिली बस सकाळी ७ वाजता, तर शेवटची बस ९.५0 मिनिटांनी असेल.वाशी स्थानकातून पहिली बस सकाळी ७.२५ मिनिटांनी, तर शेवटची बस १0.१४ मिनिटांनी असेल. मार्ग क्रमांक २८:घणसोली आगारातून पहिली बस सकाळी ६ वाजता, तर शेवटची बस ८.0५ मिनिटांनी असेल. मार्ग क्रमांक १११ :नेरूळ बस स्थानकातून पहिली बस सकाळी ६.५५ मिनिटांनी, तर शेवटची बस ९.00 वाजता असेल.