शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले; राज्यभर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 20:04 IST

राज्य शासनाने येत्या ७ ऑक्टोंबरपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा..

ठळक मुद्देमहाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने याबाबत दिले निवेदन प्रसिद्धीला

बारामती: राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासुन वेतन रखडले आहे.त्यामुळे आर्थिक  संकटात सापडलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने येत्या ७ ऑक्टोंबरपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा.अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.  संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार कोविड संकटाच्या काळात देखील एसटी कामगार जीवाची बाजी लावून करत आहेत.मात्र, गेल्या जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रलबंति वेतन व सप्टेंबरचे देय वेतनासह तीन महिन्यांपासुन या कामगारांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे वेतनाअभावी सर्व कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या ७ तारखेपर्यंत वेतनाबाबत मार्ग काढावा.अन्यथा ९ ऑक्टोबर रोजी राज्यभर विभागीय कार्यालयांसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.  वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक आहे. निधी नसल्याचे कारण सांगून राज्य सरकार कडून महामंडळाकडून मदत मागितली आहे. परंतु या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्र्यांसह प्रशासनाशी वेळोवेळी भेट घेऊन निवेदने दिली आहेत. त्यानंतर देखील वेतनाबाबत तोडगा निघालेला नाही. वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर विभागीय कार्यालयांसमोर आत्मक्लेश आमरण उपोषण केले जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीST Strikeएसटी संपcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार