विमानतळाचे आधुनिकीकरणनागपूर : मिहान-सेझ प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाल्यानंतर नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत विमानतळ बनविण्यासाठी राज्य सरकार भागीदार शोधण्याच्या ध्येयपूर्तीसाठी पुढील तीन महिन्यात जागतिक निविदा काढणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.ग्लोबल नागपूर समिटच्या पहिल्या सत्रात बोलताना गडकरी यांनी सांगितले की, मिहान-सेझमध्ये अखंड व स्वस्त दरात विजेचा पुरवठा आणि राज्य सरकार (४०० हेक्टर) व हवाईदल (२७८ हेक्टर) यांच्यात जागेची अदलाबदल, हे दोन्ही सकारात्मक निर्णय झाले आहेत. यामुळे मिहानमध्ये दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग खुला झाला आहे. दुसरी धावपट्टी आणि विमानतळाच्या बांधकामासाठी भागीदाराचा शोध घेण्यासाठी तीन महिन्यात जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) आॅगस्ट २००९ मध्ये मिहान-सेझची नोडल एजन्सी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) हस्तांतरित केला आहे. त्यामुळे एमएआयडीसीने विमानतळाच्या विकासाचा निर्णय घेतला आहे. या कार्यात अनेक अडचणी आल्यामुळे आतापर्यंत निविदा काढता आल्या नाहीत. एमएडीसीच्या योजनेनुसार भागीदाराला नागपूर विमानतळाचे संचालन करण्यासाठी मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ७४ टक्के गुंतवणूक करावी लागेल. सध्या सिंगापूर इंटरनॅशनल विमानतळाचे संचालन करणाऱ्या चांगी विमानतळ कंपनीने २००९ मध्ये एमएडीसीला प्रस्ताव दिला होता, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)सिम्बायसिसची चमू नागपुरातगडकरी यांनी सांगितले की, जागतिक दर्जाची बिझनेस मॅनेजमेंट स्कूल नागपुरात स्थापन करण्यासाठी पुणे येथील बी-स्कूल ‘सिम्बायसिस’ची चमू शनिवारी नागपुरात आली आहे. दरवर्षी जवळपास ७ हजार विद्यार्थी नागपुरातून मेट्रो शहरांमध्ये शिक्षणासाठी जातात. आयआयएम आणि सिम्बोसिस आल्यानंतर नागपूर हे बी-स्कूल कॅपिटल होईल. स्कॅनियाचा बुटीबोरीत बस प्रकल्पइथेनॉल इंधनावर धावणाऱ्या गाड्यांचे उत्पादन करणारी स्वीडन येथील आॅटोमोबाईल क्षेत्रातील मोठी कंपनी ‘स्कॅनिया’ आपला उत्पादन प्रकल्प बुटीबोरी येथे सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. या प्रकल्पाची विस्तृत माहिती गडकरी यांनी दिली नाही.
तीन महिन्यात जागतिक निविदा
By admin | Updated: December 28, 2014 00:43 IST