पनवेल : तळोजा मध्यवर्ती कारागृहात तीन मोबाइल सापडल्याची घटना गुरुवारी घडली. गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांच्या शुक्रवारी असलेल्या नियोजित दौऱ्याच्या एक दिवस आगोदर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे त्यांनी शुक्र वारी सांगितले. तळोजा मध्यवर्ती कारागृहात २१०० कैद्यांची क्षमता आहे. सध्या या ठिकाणी १७०० कैदी आहेत. आत्महत्या, आत्महत्येचे प्रयत्न अशा घटना या ठिकाणी नेहमी होत असतात. मात्र कारागृहात मोबाइल सापडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. तळोजा येथील कारागृहात जामर बसविण्यात आलेले असून, मोबाइल सेवा कारागृहाअंतर्गत सुरू कशी झाली? हादेखील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे. कक्ष क्र मांक ७ रूम क्रमांक ७६मधील अंडासेलमध्ये हे मोबाइल सापडले आहेत.या तुरुंगात कुख्यात गुंड अबू सालेम, कर्नल पुरोहित यांसारखे आरोपी आहेत. त्यामुळे जेलमध्ये मोबाइल सापडण्याच्या या घटनेचे गांभीर्य व्यक्त होत आहे. कारागृहातील यंत्रणा कैद्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचेदेखील बोलले जाते.
तळोजा कारागृहात सापडले तीन मोबाइल
By admin | Updated: May 16, 2015 03:01 IST