शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या पोटात तीन किलोची गाठ !

By admin | Updated: July 23, 2016 02:07 IST

जन्मत: पाठीच्या मणक्याजवळ असलेली गाठ वाढत जाऊन तीन किलो वजनाची झाली. पण उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहणाऱ्या मुलीवर उपचार झाले नव्हते.

मुंबई : जन्मत: पाठीच्या मणक्याजवळ असलेली गाठ वाढत जाऊन तीन किलो वजनाची झाली. पण उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहणाऱ्या मुलीवर उपचार झाले नव्हते. गाठ पोटापर्यंत आल्यामुळे मुलीचे पालक घाबरले होते. शेवटी त्यांनी मुंबईतील सायन रुग्णालय गाठले. सायन रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ विभागाने सात तास शस्त्रक्रिया करून ही गाठ काढल्याची माहिती रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. पारस कोठारी यांनी दिली.बाळ गर्भात असतानाच मणक्याच्या शेवटच्या हाडाजवळ गाठ वाढण्यास सुरुवात होते. बाळाच्या वाढीबरोबर ही गाठ वाढत असते. आझमगढ येथे राहणाऱ्या दुर्गावती देवी यांच्या गर्भात असणाऱ्या बाळाच्या मणक्याजवळ गाठ वाढत असल्याचे दिसून आले होते. बाळ जन्माला आल्यावर गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण ही गाठ काढता येऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. मुलीच्या वाढीबरोबर गाठीचा आकार आणि वजनही वाढत होते. मुलीला सायन रुग्णालयात आणले तेव्हा नऊ महिन्यांच्या मुलीचे वजन नऊ किलो होते. त्यात गाठ तीन किलोची होती. ही गाठ मणक्यापासून वाढत पोटात पसरली होती. हृदयातून येणाऱ्या ‘अ‍ॅओटा’ या प्रमुख रक्तवाहिनीला चिकटली होती. त्याचबरोबर यकृत, मूत्रपिंड, आतड्यांना चिकटली असल्याचे डॉ. कोठारी यांनी स्पष्ट केले. या मुलीवर सात तास शस्त्रक्रिया सुरू होती. कोणत्याही अवयवाला आणि रक्तवाहिन्यांना इजा न होऊ देता ही गाठ काढण्यात आली. सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर टीमने ही गाठ बाहेर काढली. पण शौचाच्या जागेजवळ ही गाठ असल्यामुळे तिकडचे स्नायू कमकुवत झाले आहेत. त्यामुळे शौचासाठी मुलीच्या पोटातून नळीने जागा केली आहे. पुढच्या सहा महिन्यांत स्नायूंना बळकटी आल्यावर पोटावर केलेली जागा बंद करण्यात येईल. गाठ काढल्यामुळे आता मुलगी सर्वसामान्य आयुष्य जगू शकते. तिच्या जीवाला कुठलाही धोका नाही. मुलीला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा महिन्यांनी आता पुन्हा तपासणी करण्यात येईल, असे डॉ. कोठारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >मुलीच्या वाढीबरोबर गाठीचा आकार आणि वजनही वाढत होते. मुलीला सायन रुग्णालयात आणले तेव्हा नऊ महिन्यांच्या मुलीचे वजन नऊ किलो होते. त्यात गाठ तीन किलोची होती. ही गाठ मणक्यापासून वाढत पोटात पसरली होती. हृदयातून येणाऱ्या ‘अ‍ॅओटा’ या प्रमुख रक्तवाहिनीला चिकटली होती.